मुंबई : पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक घेतला जात आहे. हे काम आणखी आठवडाभर सुरू राहणार असल्यामुळे आज, सोमवारपासून दररोज ३१६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबपर्यंत या ११ दिवसांत २,५२५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. २७ आणि २८ तारखेला प्रत्येकी २५६ फेऱ्या रद्द झाल्या. तर रविवारी ११६ अप आणि ११४ डाऊन अशा एकूण २३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. शुक्रवारी झालेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी धक्काबुक्कीच्या घटना घडल्या. आता सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवसापासून या ब्लॉकचा खऱ्या अर्थाने फटका बसण्यास सुरुवात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज अप आणि डाऊन मिळून ३१६ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. रोजच्या सुमारे एक हजार फेऱ्यांपैकी २३ टक्के फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे रोजच्या २८ ते ३० लाख प्रवाशांचा भार उर्वरित सेवेवर येणार असल्याने गर्दी मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. शिवाय या काळात संपूर्ण वेळापत्रक बदलणार असल्याने, सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवास करणे कठीण होऊन बसणार आहे. 

Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Mumbai Rain Update
Mumbai Rain Red Alert : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचं रुप, रेल्वेची उशिराने धाव, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी!
Mumbai mega block marathi news
मुंबई: पश्चिम रेल्वेवर साडेचार तासांचा ब्लॉक
Iron barrier Dombivli railway station,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर लोखंडी रोधक, रेल्वे मार्गातून जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बंद
lpg cylinder on railway track
उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न; कानपूरजवळ रेल्वे रुळावर आढळले गॅस सिलिंडर; एका महिन्यातली पाचवी घटना
Harbor route disrupted, Harbor route local railway,
मुंबई : हार्बर मार्ग विस्कळीत
kdmc issue notices illegal shops near kopar railway station
कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा गाळ्यांना नोटिसा; रेल्वे मार्गातील जिना बंद करून गाळ्यांची उभारणी

हेही वाचा >>>एसटीचे रुतलेले आर्थिक चाक रुळावर; ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठीच्या सवलती महामंडळाच्या पथ्यावर

प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ व स्वतंत्र एक्स्प्रेस मार्ग तयार करण्यासाठी मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) दोन अंतर्गत या मार्गिकेला २००८ साली मान्यता देण्यात आली होती. एवढी वर्षे धीम्या गतीने सुरू असलेल्या कामाने आता गती घेतली असून त्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

महत्त्वाचे काम असेल तरच लोकल प्रवास करा, असे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे. गर्दीतून प्रवास करण्याऐवजी पर्यायी वाहतुकीचा अवलंब करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाने पश्चिम रेल्वेला समांतर असलेल्या एस. व्ही. रोड, लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील २०२ मर्यादित, २०३, ४ मर्यादित, ८४ मर्यादित, ३३, २२५, ४४० मर्यादित, ४० मर्यादित या मार्गावर अतिरिक्त बसगाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.