लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : रेल्वे रूळ, सिंगल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे – दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ठाणे आणि वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : ठाणे – दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० दरम्यान
परिणाम : ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील मेल / एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तर एलटीटीहून सुटणाऱ्या डाऊन पाचव्या मार्गावरील मेल / एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. तसेच रेल्वेगाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील.
आणखी वाचा-कूपर रुग्णालयात महिला रुग्णाने मारली सहाव्या मजल्यावरून उडी
ट्रान्स हार्बर मार्ग
कुठे : ठाणे ते वाशी / नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील. तर, ठाणे ते वाशी / नेरुळ / पनवेल अप आणि डाऊ लोकल सेवा बंद असेल.