लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा – मुंब्रा दरम्यान पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी आणि मंगळवारी रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दिवा ते मुंब्रा दरम्यान अप मार्गावर रविवारी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १२१८१ मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दिवा येथे रात्री ३.०५ ते रात्री ३.३० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक बनारस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण येथे रात्री ३ ते रात्री ३.१५ दरम्यान थांबवण्यात येईल. मंगळवारी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक १२१०२ शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दिवा येथे रात्री ३.०५ ते रात्री ३.३० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक बनारस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण येथे रात्री ३ ते रात्री ३.१५ वाजेपर्यंत थांबवण्यात येईल. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.