मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत कि.मी १.५५० येथे मुंबई ते पुणे (पुणेकडे जाणाऱ्या वाहिनीवर) गॅन्ट्री बसविण्याचे काम आज करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) दुपारी १२.०० ते दुपारी१.०० वाजेदरम्यान हे काम करण्यात येणार असून त्यासाठी थ्री लेग सर्व्हिसेबल गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरु करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

हेही वाचा – धारावीत तीन मजली इमारतीला भीषण आग, सहाजण जखमी

Western Expressway, Repair of bridges Western Expressway, Western Expressway latest news,
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ४४ पूल व भुयारी मार्गांची दुरुस्ती
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
New bridge in Malad, municipal corporation Mumbai,
मालाडमध्ये नवीन पूल, पालिका करणार १९२ कोटी रुपये खर्च
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Diwali is in next week There will be various events in sky as well
दिवाळीत अवकाशात मनमोहक घडामोडींची पर्वणी,पृथ्वीवरुन पाच ग्रहांचे…
Funds to Urban Development Department for Construction of Elevated Road of Rustamji Urbania Housing Complex thane news
रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलाच्या उन्नत मार्गाच्या हालचालींना वेग
India china agreement on patrolling along with lac in eastern Ladakh
अग्रलेख : सहमतीतील अर्थमती
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :  प्रक्रिया धुडकावून अधिसूचना

पर्यायी मार्ग –

१) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवरील (मुंबईहून पुणेकडे) जाणारी हलकी वाहने ही कळंबोली कि.मी. ००.००० येथून होते डावे बाजूस वळवून कळंबोली सर्कलवरुन मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरुन मार्गस्थ करता येतील.

२) द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कळंबोली कि.मी.००.००० येथून डावे बाजूस वळवून कळंबोली सर्कलवरुन कळंबोली-डी-पाँईट – करंजाडे – पळस्पे व पुढे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरुन मार्गस्थ करता येतील.

हेही वाचा – विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीचा पेच; स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकराजचा परिणाम

३) द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कोन ब्रिजवरुन वळवून घेवून कि.मी. ०९.८०० येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.

४) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबई ते पुणे वाहिनीवर (मुंबईहून पुणेकडे) जाणारी सर्व प्रकारची वाहने राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन पुढे जावून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पाँईट कि.मी. ४२ ००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील.