मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कुठे : माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर

हेही वाचा >>>माथाडी युनियनचा पदाधिकारी असल्याचे भासवून खंडणीची मागणी; एकाला अटक

कुठे : कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशीदरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड – भाईंदर अप आणि धीम्या जलद मार्गावर

कधी : शनिवारी मध्यरात्री ११.३० ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील सर्व जलद लोकल विरार ते भाईंदर / बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.