पश्चिम रेल्वेवरील डहाणू रोड येथे पायाभूत कामांच्या उभारणीसाठी बुधवारी सकाळी ८.५० ते सकाळी ११.५० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही लोकल फेऱ्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मेल-एक्स्प्रेस ३० ते ४५ मिनिटे विलंबाने धावतील. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७.५१ वाजता अंधेरी – डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येईल. ब्लॉककाळात वाणगाव – डहाणू रोडदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या  आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोकलचा अपघात टाळण्यासाठी रेल्वेची नवी मात्रा; सतर्कतेसाठी मोटरमनला मिळणार आगाऊ सूचना

सकाळी ९.३७ वाजता डहाणू रोड – विरार लोकल डहाणू रोड – वाणगावदरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही लोकल वाणगाववरून विरारपर्यंत धावेल. सकाळी ७.४२ वाजता चर्चगे – डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. ब्लॉककाळात वाणगाव – डहाणू रोडदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी १०.१० वाजता डहाणू रोड – विरार लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येईल. तसेच वाणगाव – विरारदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> व्यवसाय परवाना वितरणातील पारदर्शकतेसाठी मुंबई महानगरपालिकेचे एक पाऊल पुढे, नऊ सदस्यीय समिती स्थापन

सकाळी ८.४९ वाजता चर्चगेट – डहाणू रोड लोकल वाणगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. वाणगाव – डहाणू रोडदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ११.३५ वाजता डहाणू रोड – विरार लोकल डहाणू रोड – वाणगावपर्यंत रद्द असेल. ही लोकल वाणगावपासून विरारपर्यंत चालवण्यात येईल. ब्लाॅकमुळे गाडी क्रमांक २२९३० बडोदा-डहाणू रोड एक्स्प्रेसला उमरगाम रोड स्थानकादरम्यान ४५ मिनिटे थांबवण्यात येणार आहे. तर, गाडी क्रमांक २२९५६ भुज-वांद्रे टर्मिनसला कच्छ एक्स्प्रेसला ३० मिनिटे थांबवण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Block on western railway for construction of infrastructure works at dahanu road mumbai print news zws