जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईत भरडलेल्या सर्वसामान्यांना आता रक्तासाठीही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आघाडी सरकारने जाता जाता घेतलेल्या निर्णयामुळे रक्ताच्या किमती तब्बल अडीच पटीने वाढल्या आहेत. रक्ताची कमतरता भासू नये यासाठी राज्यात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र तरीही उपलब्ध असलेल्या रक्ताची किंमतच रुग्णांना परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे ‘आजार परवडला, पण उपचार आवरा’ असे म्हणायची वेळ रुग्णांवर आली आहे.
जून महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी व पडसाद आता उमटू लागले आहेत. सरकारी रुग्णालयांच्या रक्तपेढय़ांमध्ये हे दर लागू झाल्यावर आधीच हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या रुग्णांना पैसे उभे करणे जिकिरीचे जात आहेत. त्यातच रक्तघटकांसाठी खासगी रक्तपेढय़ांकडे जावे लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची स्थिती अगदीच केविलवाणी होत आहे. जे. जे. महानगर रक्तपेढीतील रक्ताचे दर अजूनही पूर्वीसारखेच असले तरी नवीन दरांच्या अंमलबजावणीबाबत नुकतीच बैठक झाली. मुंबई महानगरपालिकेतील रक्ताचे दरही पूर्वीसारखेच असले तरी सुधारित रक्तदरांची अंमलबजावणी व नियंत्रण याबाबत बुधवारी बैठक घेण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा