मुंबई: ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील वाढता उष्मा आणि दिवाळीच्या सुट्टीत परगावी फिरायला जाणाऱ्यांची मोठी संख्या यामुळे रक्त संकलनाची प्रक्रिया थंडावली असून त्याचा परिणाम रक्तपेढ्यांकडील रक्ताच्या युनिटवर झाला आहे. रक्तपेढ्यांकडून ई रक्तकोषवर करण्यात येत असलेल्या नोंदीनुसार मुंबईतील महत्त्वाच्या सरकारी रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची उपलब्धता कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रक्तपेढ्यांमधील रक्ताच्या साठ्याची उपलब्धता कळावी यासाठी ई रक्तकोष या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची नोंद करणे अनिवार्य आहे. दररोज सकाळी ई रक्तकोष या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची नोंद केली जाते. त्यानुसार मुबईतील महत्त्वाच्या सरकारी रुग्णालयांमध्ये काही दिवसांपासून कमी रक्त युनिट उपलब्ध असल्याचे ई रक्तकोषवर निदर्शनास आले आहे.

हेही वाचा… प्रदुषणविरोधी मोहिमेला जोर; नऊ दिवसांत ८४४५ वाहनांवर कारवाई

मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये बी पॉझिटिव्ह रक्ताचे फक्त तीन युनिट उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जे.जे. रुग्णालय रक्तपेढीमध्ये विविध रक्तघटकांचे नऊ युनिट, जे.जे. महानगर रक्तपेढीमध्ये ८ युनिट, राजावाडीमध्ये १ युनिट, शीव रुग्णालयात ५ युनिट, केईएम रुग्णालयामध्ये ५७ युनिट, तर नायर रुग्णालयात सर्वाधिक १५२ युनिट रक्त उपलब्ध असल्याचे ई रक्तकोषवरील नोंदीवरून दिसून येत आहे. ई रक्तकोषवरील नोंदीनुसार सरकारी रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.

दिवाळीमध्ये रुग्णांचा शस्त्रक्रिया करून घेण्याकडे फारसा कल नसतो. त्यामुळे रक्ताची फारशी गरज भासत नाही. रक्ताची मागणी नसल्याने सध्या रक्ताचा तुटवडा नाही. – सुभाष सोने, जनमाहिती अधिकारी, राज्य रक्त संक्रमण परिषद

रक्ताची उपलब्धता

सेंट जॉर्ज रुग्णालय – बी+ : ३
राजावाडी रुग्णालय – बी- : १
नायर रुग्णालय – बी+ : २२, एबी+ : ७, ओ- : २, ओ+ : १०२, एबी- : १, ए- : ४, ए+ : १४
केईएम रुग्णालय – बी+ : ६, ए+ : १४, ओ- : १, एबी+ : ६, ओ+ : ३०
शीव रुग्णालय – एबी- : २, बी- : 1, ओ-: २
जे.जे. महानगर पतपेढी – बी+ : २, एबी+ : २, ए+ : २, ओ+ : २
जे.जे. रुग्णालय – एबी+ : १, बी- : २, ओ- : २, ए+ : ३, एबी- : १

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood shortage in government hospitals in mumbai print news dvr