या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संदीप आचार्य

शीव रुग्णालयात जालन्याहून आलेल्या एका रुग्णाच्या हृदयापासून पायाकडे आणि मेंदूकडे जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीवरील दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे.

जालना येथून चाळिशीचा एक रुग्ण छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन पालिकेच्या शीव रुग्णालयात आला. हृदयविकार विभागात त्याची तपासणी करण्यात आली. सीटी स्कॅनमध्ये हृदयापासून मानेकडे व पायाकडे जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीवर (ऑरोटा) मोठी सूज होती तसेच आतून ही रक्तवाहिनी उसवली असल्याचे आढळून आले. रेडिओलॉजीअंतर्गत येणाऱ्या डीएसए विभागात सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक उकिर्डे यांच्याकडे त्याला पाठविण्यात आले. त्यांनी तपासणी करून मानेकडून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीवरील शस्त्रक्रियेसाठी हृदयशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. जयंत खांडेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. नीलकंठन यांच्या आधिपत्याखाली शस्त्रक्रिया करून हृदयशल्यचिकित्सा विभागाच्या डॉक्टरांनी मानेकडून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीतील अडथळा दूर केला. डॉ. नीलकंठन यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर डीएसए विभागात डॉ. विवेक उकिर्डे आणि सहकारी डॉक्टरांनी पायाकडे जाणाऱ्या नसांमध्ये ग्राफ्ट घातला. त्यामुळे रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत झाली.

देशातील काही मोजक्याच शासकीय रुग्णालयांमध्ये डीएसए मशीन उपलब्ध आहे. याची किंमत साडेआठ कोटी रुपये आहे. शीव रुग्णालयात २०१६ पासून हे मशीन कार्यान्वित असून त्याद्वारे आतापर्यंत तीन हजारहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

– डॉ. विवेक उकिर्डे, डीएसए विभागातील सहयोगी प्राध्यापक