मुंबई : मुंबई डेंग्यू व हिवतापमुक्त करण्यासाठी सूक्ष्म उपाययोजना करण्यावर भर देण्याबरोबर कृती आराखडा तया करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर जनजागृतीवर अधिक भर द्यायला हवा, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले.

पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात जून हा ‘हिवताप विरोधी महिना’ म्हणून पाळण्यात येतो. राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी एकत्रितरित्या मुंबईमध्ये दोन दिवसीय विशेष कार्यशाळा आणि परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रात डॉ. सुधाकर शिंदे बोलत होते.

हेही वाचा : मविआच्या आशा पल्लवीत

वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून हिवताप निर्मूलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सूचित केले. राज्य सरकारच्या हिवताप आणि कीटकजन्य आजार विभागाच्या तांत्रिक अधिकारी डॉ. रुप कुमारी यांनी रुग्णांवरील उपचाराबद्दलच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच हिवताप नियंत्रणासाठी १ – ३ – ७ धोरणचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटनेचे पथकप्रमुख डॉ. बद्री थापा यांनी हिवताप उद्रेकांचा तपास कसा करता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याच आवाहन केले. डॉ. एन. आर. तुली यांनी दिल्लीत विविध उपाययोजना कशा प्रकारे राबविल्या जातात, तसेच समुदाय जागरुकता कशी केली जाते यावर लक्ष केंद्रीत केले. मुंबई महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सर्वांना सूक्ष्म योजना आखून काम करण्याचे आवाहन केले. हिवताप, डेंग्यू नियंत्रणात आणणे, त्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, कीटकनियंत्रण प्रभावीपणे राबविणे इत्यादी विषयांवर या परिसंवादात चर्चा झाली.

हेही वाचा : भाजपला ‘असंगाशी संग’ भोवला?

यावेळी मुबई महानगरपालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व ७ परिमंडळातील उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कीटकनाशक अधिकारी आदींचा सहभाग होता.

Story img Loader