इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई  : मुंबईकरांसाठी यंदापासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जूनमध्ये होणारी पाणीपट्टीतील वाढ करोनाकाळात झाली नव्हती. यंदा मात्र पाणीपट्टीत ६ ते ७ टक्के वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार असून पाणीपुरवठय़ावर झालेल्या खर्चाचा आढावा लेखा विभागातर्फे घेतला जात आहे. या महिन्याच्या अखेपर्यंत पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव तयार होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही वाढ लागू होणार का याबाबत उत्सुकता आहे.

Ramdas Athawale On Saif Ali Khan Attack
Ramdas Athawale : “मुंबई पोलिसांना सक्त सूचना…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Sanjay Raut On Mumbai Municipal elections 2025
Sanjay Raut : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा

मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेला पाण्याचे स्रोत विकसित करणे, जलशुद्धीकरण करणे, पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, गळती दुरुस्त करणे, देखभाल व दुरुस्ती करणे अशी विविध कामे करावी लागतात. या सर्व कामांसाठी पालिकेला येत असलेल्या खर्चाच्या तुलनेत पाणीपट्टी आकारली जाते. दरवर्षी जून महिन्यात काही टक्के वाढ केली जाते. करोना व टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी ही वाढ करण्यात आली नव्हती.

पाणीपुरवठय़ासाठी गेल्या आर्थिक वर्षांत पालिकेचा किती खर्च झाला त्याचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरू असून येत्या पंधरा दिवसांत नक्की किती वाढ करायची याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेने पाणीपट्टीत वाढ केल्यास त्याचा सर्वात भार उद्योगधंदे, कारखाने, बांधकामे यांना बसणार आहे. मात्र लवकरच पालिकेची निवडणूक अपेक्षित असून मतदारांचा रोष ओढवून घेण्यास राजकीय पक्ष तयार होतील का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

ल्लभातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, विहार व तुळशी या सातही धरणांतून दीड कोटी मुंबईकरांना दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रचलित धोरणानुसार नियोजनबद्ध इमारतीतील रहिवाशांना प्रतिदिन प्रतिव्यक्त १३५ लिटर या दराने पाणीपुरवठा केला जातो. इमारतीतील रहिवाशांसाठी सध्याचे दर ५.२२ रुपये प्रति हजार लिटर इतके आहेत. 

करोनामुळे पाणीपट्टीत वाढ करण्यात आली नव्हती. या वर्षी मात्र पाणीपट्टीत वाढ करावी लागणार आहे.     – पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त 

Story img Loader