मुंबई : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून यावेळी समुद्रात साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ५ ते ८ जूनदरम्यान दररोज समुद्रात मोठी भरती येणार आहे. या पावसाळ्यातील चार महिन्यांत एकूण २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सगळयात मोठी भरती २० सप्टेंबर रोजी येणार असून यावेळी ४.८० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
हेही वाचा >>> दहिसरमध्ये दुचाकीच्या धडकेनंतर ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू; रिक्षा चालकानेही रुग्णालयात नेण्याऐवजी रस्ताच्या कडेला सोडले
पालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरती – ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले असून यंदा पावसाळ्यात २२ वेळा मोठी भरती येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे. चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असला तरी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असतील आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखलभागात पाणी साचते. त्यामुळे भरती – ओहोटीच्या वेळा मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
जून महिन्यातील या दिवशी येणार मोठी भरती
दिवस वेळ लाटांची उंची
गुरुवार, ६ जून दुपारी १२.०५ ४.६९ मीटर
शुक्रवार, ७ जून दुपारी १२.५० ४.६७ मीटर
शनिवार, ८ जून दुपारी १.३४ ४.५८ मीटर
रविवार, २३ जून दुपारी १.०९ ४.५१ मीटर
सोमवार, २४ जून दुपारी १.५३ ४.५४ मीटर
मंगळवार, २५ जून दुपारी १४३६ ४.५३ मीटर