बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) स्थायी समितीने भायखळा प्राणी संग्रहालयातील पेंग्विन्सच्या तीन वर्षांसाठीच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपयांच्या निविदेस मंजुरी दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिवसेनेच्या नेतृत्वातील मुंबई महापालिकेने सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली. तर, भाजपने मात्र देखभाल खर्च खूप जास्त असल्याचे कारण देत याला विरोध दर्शवला होता. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही या निविदेस विरोध दर्शवला गेला होता. या निविदेवरून भाजपा आणि काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला व पालिका प्रशासनाला लक्ष्य केले होते. हा १५ कोटी रुपये खर्च म्हणजे पालिकेचा तोटा असल्याची टीका दोन्ही पक्षांनी केली होती. मात्र हा विरोध झुगारून बीएमसीकडून निविदेस मंजुरी देण्यात आल्याचे दिसत आहे.
पेंग्विन देखभाल निविदेला काँग्रेसचा विरोध
तर, भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीची बाग) पेंग्विन दाखल झाल्यापासून प्राणी संग्रहालयाचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पेंग्विन आल्यानंतर २०१७ पासून पालिके ला १२ कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळाला असल्याचा प्रशासनाचे म्हणणे आहे. पेंग्विनमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
पेंग्विनमुळे पालिकेचा महसूल वाढला
एवढच नाही तर राणीच्या बागेत पेंग्विन येण्यापूर्वीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांच्या आत होते. २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत मिळून दोन कोटी १० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र पेंग्विन आल्यानंतर एप्रिल २०१७ पासून मार्च २०२० पर्यंतचे पालिकेचे एकूण उत्पन्न १४.३६ कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच पेंग्विनमुळे निव्वळ १२.२६ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केलेला आहे. पेंग्विन पक्षी आणण्याचे एकूण कं त्राट ११.४६ कोटी रुपये होते. पेंग्विनच्याबाबत खर्चापेक्षा जास्त उत्पन्न होते असाही दावा देखील आयुक्तांनी केलेला आहे.
याचबरोबर, पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ठाकरे सरकारवर चांगलीच टीका करत मुंबईत पोस्टरबाजी केली होती.
खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?; मनसेची मुंबईत पोस्टरबाजी
मनसेकडून मुंबईतल्या वरळीसह काही भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टरवर शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला टोला लगावल्याचं दिसून आलं होतं. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी आहे असा टोलाही मनसेने लगावला होता.