मुंबई :  पालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या पालिका अर्थसंकल्पाच्या आडून निवडणुकीच्या घोषणा करण्याची संधीही सत्ताधारी शिवसेनेने साधली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजना, योगाभ्यासासाठी शिव योग केंद्र सुरू करण्याची घोषणा करून शिवसेनेने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिव्हाळय़ाचा विषय असलेल्या पर्यावरण विभागालाही या अर्थसंकल्पात खास महत्त्व देण्यात आले आहे. 

निवडणुकीच्या तोंडावर जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अर्थसंकल्पात दीर्घकालीन प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी नागरिकांना झटपट लाभ मिळेल अशा दोन प्रमुख सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.  त्यामध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य केंद्र संकल्पनेनुसार पालिकेच्या आरोग्य केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत ही आरोग्य केंद्रे उभारली जातील किंवा आहे त्या केंद्रामध्ये सुधारणा करण्यात येईल, असे सूतोवाच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. या केंद्रांमधून नाममात्र दरात व काही मोफत चाचण्या केल्या जाणार आहेत. नागरिकांच्या घराजवळ ही केंद्रे उपलब्ध करण्यात येणार आहेत. तर योगाभ्यासासाठी सार्वजनिक ठिकाणी शिव योग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी जागा सुचवल्यास त्यांना ही सुविधा त्यांच्या सोयीने दिली जाणार आहे. या दोन्ही योजनांची नावे शिवसेनेशी जोडून पक्षाने निवडणुकीतील प्रचाराचा नारळच फोडल्याचे म्हटले जात आहे.

msrdc first step to get shaktipeeth project underway
‘शक्तिपीठ’ला पुन्हा बळ; राज्य सरकारचा हिरवा कंदिल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Five Political Trends in 2025
भाजपा-संघाचे संबंध ते प्रियांका गांधींचा प्रभाव; २०२५ मध्ये या ‘५’ राजकीय विषयांकडे असेल देशाचे लक्ष
Loksatta explained Why insist on the post of Guardian Minister of a specific district
विश्लेषण : पालकमंत्रीपदासाठी एवढा अट्टहास का ?
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित
will demand to provide additional water storage from Mulshi Dam for Pimpri-Chinchwad says Commissioner Shekhar Singh
…तर मुळशीतून पाणी द्या; आयुक्तांची भूमिका
all-party feliciation Abdul Sattar chhatrapati sambhaji nagar
अब्दुल सत्तारांच्या सर्वपक्षीय सत्काराकडे महायुतीतील नेत्यांची पाठ

निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील प्रत्येक घराला पाणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याकरिता अद्ययावत धोरण आणण्याचेही सूतोवाच करण्यात आले आहे. पर्यावरणमंत्र्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय असलेल्या पर्यावरण या विषयालाही खास महत्त्व दिले आहे. घन कचरा विभागातील सर्व वाहने विजेवर चालणारी आणण्यात येणार आहेत. तर बेस्टचा संपूर्ण ताफा विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचा करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 मुंबईतील सार्वजनिक वाहनतळांमध्ये सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहने चार्जिग स्टेशन स्थापित करण्यात येणार आहे. ३० वाहनतळांपैकी १२ सार्वजनिक वाहनतळांवर चार्जिग स्टेशन उभारण्यासाठी खासगी कंपन्यांना इरादापत्रही देण्यात आले आहे. या धोरणाचे विस्तारीकरण करून रस्त्यावरील पार्किंगसुद्धा लागू करण्यात येणार आहे.

नवी आरोग्य केंद्रे कशाला?

पालिकेची २११ आरोग्य केंद्रे आणि १८९ दवाखाने उपलब्ध असतानाही नवीन आरोग्य केंद्रांची निर्मिती कशासाठी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी केलेल्या ४०० कोटी रुपयांचा विनियोग उपलब्ध आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांचा दर्जा उंचावण्यासाठी करण्याऐवजी नवीन केंद्रांची निर्मितीमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर टीका केली जात आहे. सध्या उपलब्ध असलेल्या आपली चिकित्सा योजनेअंतर्गत मोफत चाचण्या केल्या जात असताना या केंद्रामध्ये नव्याने खासगी प्रयोगशाळांशी करार करण्यामागे काय प्रयोजन आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Story img Loader