मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या महिन्याभरात होण्याची शक्यता असताना यंदाच्या पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काय महत्त्वाचं आणि फायद्याचं असेल, याचे अंदाज लावले जात होते. अखेर आज तब्बल ४६ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७ हजार कोटीनी हा आकडा मोठा असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असल्याचं बोललं जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात इतर घोषणांसोबतच दरवर्षी सालाबादप्रमाणे मुंबईत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीसाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे.

मुंबईची तुंबई कधी थांबणार?

दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. अनेक भागांमध्ये हे पाणी साचतं. त्यामुळे मुंबईचं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होतं. विशेषत: मुंबईची लोकल सेवा विस्कळीत होते. त्याचा मोठा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबईची तुंबई होण्यापासून टाळण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या काही कामांची यादी यंदाच्या अर्थसंकल्पात देखील समाविष्ट करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून ५६५.३६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन

BMC Budget 2022 Live: मुंबई महापालिकेचा ४६ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर; मुंबईकरांना काय मिळालं?

मुंबईत पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी शीघ्र प्रतिसाद वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

पोर्टेबल उदंचन संच

सखल भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ३०५ ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे पोर्टेबल उदंचन संच लावण्यात आले. तसेच, सन २०२१ मध्ये पावसाळ्यात जम्बो कोविड सेंटर, रेल्वे कल्व्हर्ट आणि इतर सखल भागात १३४ अतिरिक्त उदंचन संच लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक जाळया

मुंबई शहर व मुंबई उपनगरातील संवेदनशील असलेल्या ५६ ठिकाणांजवळ असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या पातमुखांवर प्रतिबंधात्मक जाळया बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

पूरप्रतिबंधक दरवाजे

मिठी नदी आणि वाकोला नदीमधून समुद्राच्या भरतीमुळे व पावसाच्या पाण्यामुळे होणारी पूरसदृश्य स्थिती टाळण्याकरिता कलानगर परिसरात एकूण ६ ठिकाणी ११ पूरप्रतिबंधक दरवाजे तसेच पाण्याचा उपसा करणाऱ्या १९ सबमर्सिबल उदंचन संचांची उभारणी करण्यात आली आहे.

हिंदमाता व गांधी मार्केट येथील उदंचन व्यवस्था

३००० घन मी / प्रतितास क्षमतेचे १५ उदंचन संच आणि गांधी मार्केट व त्याच्या खालील बाजूला साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्याकरीता हिंदमाता येथे बाजुला १८००० घन मी / प्रतितास क्षमतेचे पंप उर्ध्ववाहिनी व्यवस्थेसह आणि पूरप्रतिबंधक दरवाजांसह स्थापित करण्यात आले.

Story img Loader