Mumbai Municipal Corporation Election Budget 2024- 2025 : प्रशासकीय राजवट असलेल्या मुंबई महापालिकेचा २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी लोकसभेची निवडणूक जवळ आलेली असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, गेल्या अर्थसंकल्पापेक्षा यंदा अंदाजित अर्थसंकल्पात १०.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा ५९९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आज सादर केला. तसंच, विविध पायाभूत सुविधा, विकासकामांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १०.५० टक्क्यांनी अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ५४२५६.०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मागील वर्षी सादर करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेला चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. मालमत्ता करापोटी पालिकेला ३१ जानेवारीपर्यंत ५४०० कोटी रुपयांपैकी केवळ ६०५.७७ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले आहे. मात्र त्याच वेळी विकास नियोजन खात्याला मिळालेल्या महसुलामुळे पालिकेला मदतीचा हात मिळाला आहे. चालू वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत ४०२८.१८ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. या वर्षात विकास नियोजन शुल्कापोटी ४४०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र ते सुधारून ५५०० कोटी रुपये करण्यात आले होते. त्याचबरोबर मुदत ठेवींमधील गुंतवणुकीपोटी २२०६.३० कोटी रुपये पालिकेला मिळाले आहेत.
हेही वाचा >> BMC Budget 2024 Live: मुंबईच्या कोस्टल रोडसाठी २ हजार ९०० कोटींची तरतूद, आरोग्यासह इतर खात्यांसाठी कितीची तरतूद?
कोस्टल रोडसाठी २९००.९७ कोटींची तरतूद
मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) दक्षिण पॅकेज १,२ आणि चारची सर्व कामे प्रगतीपथावर असून २४ डिसेंबर २०२३ पर्यंत ८३.३४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली. पॅकेज चारमधील बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून आंतरबदलाचे पॅकेज १ मधील ९९ टक्के आणि पॅकेज २ मधील ६९ टक्के काम पूर्ण झाले आहे. वरळी कोळीडावाड येथील कोळी बांदवांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या निर्देशानुसार समिती नियुक्त केली होती, व समितीच्या अहवालानुसार दोन खांबांमधील अंतर ६० मीटरवरून १२० मीटकर करण्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधवांनैा मच्छिमारीकरता समुद्रात ये-जा करणे सुलभ होणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचा भाग फेब्रुवारी २०२४ पासून सुरू करण्याचा प्रयत्न असून मे २०२४ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे निर्धार करण्यात आला आहे. २०२३-२४ च्या सुधारित अंदाजात ३ हजार कोटी आणि सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २९०० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित आहे.
इतर खात्यातील तरतुदी
- घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी ४८७८.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- अग्निशमन दलासाठी ६८९.९९ कोटी रुपयांची तरतूद.
- रस्ते आणि वाहतूक प्रचालन खात्यासाठी ४३५०.९६ कोटींची तरतूद.
- आरोग्य खात्यासाठी १९१५.१२ कोटी रुपयांची तरतूद.
- पूल खात्यासाठी ४८५२.०३ कोटी रुपयांची तरतूद.
- पाणीपुरवठा प्रकल्प खात्यासाठी २४४८.४३ कोटी रुपयांची तरतूद