मुंबई : महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची आतापर्यंत ६८ टक्के वसुली करण्यात पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याला यश आले आहे. महानगरपालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ६ हजार २०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. तसेच, ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात अली होती. त्यापैकी ३१ डिसेंबरपर्यंत ६८ टक्के कराची वसुली झाली आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांत एकूण ५ हजार ८४७ कोटींहून अधिक रकमेच्या मालमत्ताकराचे संकलन करण्यात आले. यात मागील आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची रक्कम समाविष्ट आहे. दरम्यान, डिसेंबरच्या संपूर्ण महिन्यात २ हजार ५०१ कोटी ७ लाख रूपये विक्रमी कर वसूल झाला आहे.

हेही वाचा >>> डिजिटल कागदपत्रे गाह्य धरण्याबाबत वाहतूक पोलिसांना लेखी आदेश; डिजिटल कागदपत्रे दाखवल्यानंतरही दंडात्मक कारवाई

Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
knight frank report, Private investment Mumbai ,
मुंबईत गृहनिर्मिती क्षेत्रात यंदा साडेतीन हजार कोटींची खासगी गुंतवणूक, ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती
fight for post of Guardian Minister has begun among three parties in mahayuti
पालकमंत्रीपदावरून आता रस्सीखेच
National Health Policy What percentage of expenditure from the public health fund from the budget
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, आरोग्यावर फक्त ४.९१ टक्के खर्च ; ‘कॅग’चे आरोग्य यंत्रणेवर ताशेरे
House Prices Indian Real Estate Property
घरांच्या किमती वाढतायत…

महानगरपालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या नेतृत्वाखाली करनिर्धारण आणि संकलन खाते कार्यरत आहे. महानगरपालिकेतर्फे कर संकलनाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मुंबईतील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत कर भरणा करता यावा, यासाठी महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातर्फे वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी शनिवारीही प्रशासकीय विभाग कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आली होती. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी एका दिवसात तब्बल १७३ कोटी ५९ लाख रूपये, तर ३१ डिसेंबर रोजी २६० कोटी २८ लाख रूपये कर भरणा मालमत्ताधारकांनी केला. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत २५ मे २०२४ पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे १ हजार ६६० कोटी रुपये रक्कम यात समाविष्ट आहे. म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४ हजार १८७ कोटी १९ लाख रुपये कर संकलित झाला आहे.

हेही वाचा >>> तृतीय वर्ष ‘बी. कॉम.’ पाचव्या सत्र परीक्षेत ४१.७५ टक्के उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून १८ दिवसांत निकाल जाहीर

१ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शहर विभागातून एकूण १ हजार ७७४ कोटी ४३ लाख रुपये इतका मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. तसेच, पूर्व उपनगरातून १ हजार ९१ कोटी १० लाख रुपये आणि पश्चिम उपनगरातून २ हजार ९७९ कोटी ४५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात पालिकेला यश आले. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. कर भरणा करण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्यालय, सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रे रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ पासून रात्री १० पर्यंत १७३ कोटी ५९ लाख रूपये आणि ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ पासून रात्री १२ पर्यंत २६० कोटी २८ लाख रुपये मालमत्ता कर नागरिकांनी भरला.

Story img Loader