मुंबई : मुंबईतील कचरा निर्मिती आणि विल्हेवाटीचा मुंबई महापालिका शास्त्रशुद्ध अभ्यास करणार आहे. या कामासाठी पालिका लवकरच एका अनुभवी संस्थेची नेमणूक करणार आहे.मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यात कोणकोणत्या स्वरुपाचा किती कचरा असतो, त्याची विल्हेवाट कशी लावता येईल, कोणत्या ऋतूत जास्त कचरा असतो, कोणत्या सणाला किती कचरा वाढतो, झोपडपट्ट्यांमधून किती कचरा निघतो, उच्चभ्रू इमारतीतून कोणता व किती कचरा येतो, धोकादायक कचरा किती, सॅनिटरी नॅपकीनचा कचरा किती या सगळ्याचा यात समावेश असेल. तसेच या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कोणत्या उपाययोजना करता येतील त्याचेही उत्तर या अभ्यासातून मिळणे अपेक्षित आहे.

मुंबईत दरदिवशी सुमारे ६५०० मेट्रीक टन कचरा तयार होतो. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना, प्रकल्प, मोहीमा राबवल्या. मात्र तरीही कचऱ्याची समस्या आहेच. पालिकेच्या कचराभूमीची क्षमताही आता संपत आली असून या कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी अद्याप ठोस यंत्रणा उभी राहिलेली नाही. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट नियोजनबद्धपद्धतीने करून घनकचरा शुन्यावर आणण्याकरीता दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता कचऱ्याचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले आहे. मुंबईत २०१७ मध्ये दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ९४०० मेट्रीक टन इतके होते. हे प्रमाण कमी करण्यात यश आलेले असले तरी कचराभूमीवर नेण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणखी कमी करण्याची गरज आहे.

Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
MRTP, illegal building, Adivali Dhokali,
कल्याणमधील आडिवली-ढोकळीत बेकायदा इमारतीच्या विकासकांवर ‘एमआरटीपी’चा गुन्हा
All three parties in the Grand Alliance are contesting for the post of Guardian Minister Mumbai news
पालकमंत्रीपदासाठी ओढाताण; जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीतील तिन्ही पक्षांची दावेदारी
loksatta readers feedback
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
Vasai Virar Municipal corporaton , Water Supply Vasai Virar, Water Team Vasai Virar ,
वसई : पालिकेचे पाणी पथक स्थापन, आमदारांनी खडसावताच पालिका सक्रिय

हेही वाचा…मोक्याच्या खात्यांवर दावे; गृह, वित्त, ऊर्जा, जलसंपदा विभागांसाठी महायुतीत मोर्चेबांधणी

घनकचऱ्याचा प्रकार कागद व पुनर्वापराचा कचरा, धातू आगामी २० वर्षांसाठी…

या प्रक्रियेअंतर्गत नेमलेल्या संस्थेने पालिकेच्या कचऱ्याच्या आकडेवारीचा अभ्यास करणे, कचरा वर्गीकरणाच्या सध्याच्या व्यवस्थेचा अभ्यास करणे, कचरा उचलण्याची, वाहून नेण्याची विल्हेवाट लावण्याची सध्याची यंत्रणा अभ्यासणे याचा समावेश आहे.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची जी सध्याची कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा आहे त्यातील जमेची बाजू कोणती, त्रुटी कोणत्या, तंत्रज्ञान कोणते, भविष्यात कोणते तंत्रज्ञान वापरता येईल याचाही अभ्यास व शिफारस या अहवालातून मिळणे अपेक्षित आहे.

संस्थेने सर्वेक्षण, मुलाखती, तसेच जिथे जास्त कचरा निर्माण होतो त्यांच्याशी चर्चा यातून हा अभ्यास करणे अपेक्षित आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले असून लवकरच एका संस्थेची नेमणूक करण्यात येईल. तसेच पुढील दोन दशकांत लोकसंख्या किती असेल याचा अंदाज घेऊन त्या तुलनेत कचरा किती वाढेल याचाही अंदाज अपेक्षित.

हेही वाचा…वाढलेल्या मतांवर विरोधकांचे प्रश्नचिन्ह; दुसऱ्या दिवशी मतटक्का वाढल्याचा पटोले, आव्हाडांचा दावा

कचऱ्यात काय ?

मुंबईत दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ७३ टक्के भाग हा ओला कचरा असतो. यात टाकाऊ अन्नपदार्थांचा सर्वाधिक समावेश असतो. तर उर्वरित कचऱ्यामध्ये लाकूड, कापड, वाळू, दगड, माती, कागद, प्लास्टिक यांचा समावेश आहे.

अभ्यासात काय ?

पालिकेच्या प्रत्येक विभागात, दरडोई कचऱ्याचे प्रमाण किती याची आकडेवारी तयार

विविध आर्थिक, सामाजिक घटकांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ठरवणे

सात परिमंडळात त किती कचरा तयार होतो याचा अभ्यास करणे, त्यामुळे कोणत्या विभागात कचरा जास्त आहे याचा अंदाज येऊ शकेल.

विघटनशील कचरा किती, धोकादायक कचरा किती, ई कचरा किती याचा अभ्यास.

Story img Loader