मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मानखुर्द येथील टी जंक्शन परिसरात राडारोडा पडला होता. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या आदेशानुसार सोमवारी मानखुर्द टी जंक्शन ते वाशी टोल नाका परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जवळपास ५ डंपर इतका राडारोडा उचलण्यात आला. मात्र, स्वच्छता झालेल्या भागापासून काहीच अंतरावर असलेल्या मानखुर्द रेल्वे स्थानक मार्गावर पडलेला राडारोडा अद्यापही तसाच असून त्यात आता आणखी कचऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे एका भागाची स्वच्छता करताना दुसऱ्या बाजूच्या अस्वच्छतेकडे लक्ष देण्याचा पालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागाला विसर पडल्याचे दिसते आहे.

हेही वाचा >>> महालक्ष्मी सरस प्रदर्शनात यावर्षी २५ कोटींपर्यंत व्यवसाय होईल – गिरीश महाजन

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिकेकडून प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात टप्प्या – टप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत दर आठवड्याला मुंबईच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवून संबंधित कामांची पाहणी केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द परिसरातील विविध भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा तक्रार करूनही ही समस्या ‘जैसे थे’ असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकानजीक शीव – पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून कचऱ्याच्या अपुऱ्या डब्यांमुळे कायमच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने दिसून येते. त्यातच आता ‘एम पूर्व’ विभागातील अनेक भागात बांधकामाचा कचरा (डेब्रीज) वाहून नेणारे डंपर रिकामे केले जात आहेत. शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द सर्व्हिस रोड व आगरवाडी सिग्नलनजीक मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येत आहे. परिणामी, वाहकांना, नागरिकांना प्रवास करताना अडथळा निर्माण होत असून संबंधित परिसराला बकाल रूप प्राप्त झाले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सोमवारी मानखुर्द परिसरात भेट दिल्यानंतर संबंधित परिसरातील अस्वच्छता त्यांना दिसली. त्यानंतर तत्काळ संबंधित परिसर कचरामुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. यंत्रसामग्री वापरून संबंधित परिसर स्वच्छ करण्यात आला. मात्र, शीव – पनवेल महामार्गावरील इतर ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पडलेला राडारोडा अद्याप तसाच आहे. त्यामुळे पालिकेने एका बाजूची स्वच्छता केली असली तरी दुसरा भाग दुर्लक्षितच राहिल्याचे दिसून येत आहे.

शीव – पनवेल महामार्गाच्या यांत्रिकी स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून २ लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.