भीमशक्ती-शिवशक्तीचा नारा देणारे विद्रोही कवी नामदेव ढसाळ आयुष्यभर उपेक्षित राहिले. त्यामुळे नामदेव ढसाळ यांची जीवनगाथेचे स्मरण करुन देणारे कलादालन मुंबईत उभारण्याची मागणी पालिका सभागृहात शुक्रवारी करण्यात आली. नामदेव ढसाळ यांना शुक्रवारी पालिका सभागृहामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृह नेते यशोधर फणसे यांनी शोक प्रस्ताव मांडल्यानंतर विविध पक्षांतील नगरसेवकांनी ढसाळ यांच्या कार्याचा आढावा घेतला. नामदेव ढसाळ यांनी भीमशक्ती-शिवशक्तीचा  नारा दिला होता. मुंबईत त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा आणि त्यांची जीवनगाथा सांगणारे कलादालन उभारावे, अशी मागणी अपक्ष नगरसेवक मनोज संसारे यांनी केली. ही मागणी न्याय्य असून त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन महापौर सुनील प्रभू यांनी यावेळी दिले.

Story img Loader