मुंबई : वडाळा व शीव परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये, तसेच अन्य शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू किंवा गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेने मोठी धडक कारवाई केली. पालिकेच्या एफ (उत्तर) विभागाने मंगळवारी ही कारवाई करून चार दुकाने हटवली. या दुकानांतून एकूण ९३ किलो ५०० ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा – २००३ च्या कलम – ४ नुसार, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरात विडी, सिगारेट किंवा अन्य तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करण्यास, तसेच बाळगण्यास प्रतिबंध आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>>मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून गोंधळ सुरूच, आज चित्र स्पष्ट होण्याची श क्यता

potholes
मुंबई: आरे दुग्ध वसाहतीतील रस्त्यावर दोन महिन्यांतच खड्डे
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
12 candidates are in the fray in the Legislative Council elections
अकराव्या जागेसाठी चढाओढ; विधान परिषद निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात
Milind Narvekar, Legislative Council,
मिलिंद नार्वेकर ‘खेळ’ करणार ?
eknath shinde devdendra fadnavis
“कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?
domestic gas News
Annapurna Yojana: महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती सिलिंडर मोफत मिळणार?
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!

शैक्षणिक संस्थांलगतचा परिसर तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्याच्या उद्देशाने सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांच्या देखरेखीखाली एफ उत्तर विभागाने मंगळवारी धडक मोहीम हाती घेतली होती. त्याअंतर्गत दोन वेगवेगळ्या पथकांनी कोकरी आगार येथील म्हाडा कॉलनी परिसरातील प्रियदर्शनी शाळा आणि एस. के. रॉयल शाळा, शीव परिसरातील साधना शाळा, माटुंगा परिसरातील रुईया महाविद्यालय आणि पोतदार महाविद्यालय, मंचेरजी जोशी उद्यान (फाइव्ह गार्डन) परिसरातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय), तसेच माहेश्वरी उद्यान परिसर या ठिकाणी कारवाई करून ९५ किलो ५०० ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. त्यामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा आदींचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी असलेले तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत असलेले एक दुकान आणि तीन बाकडे निष्कासित करण्यात आले. कारवाईदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.