रविवारीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. सर्वत्र धुवाधार पाऊस बरसत आहे. मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून महापालिकेकडून अनेक उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत. दरम्यान, आता विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबईतील सर्व शाळांना उद्या ( मंगळवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईतील अतिवृष्टी बघता पालिका प्रशानासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मंगळवारी (९ जुलै २०२४ ) मुंबई महानगरपालिका हद्दील सर्व शाळा बंद राहतील, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

Mumbai Municipal Corporation approved three and a half thousand applications under Water for All Policy Mumbai
मुंबई: ‘सर्वांसाठी पाणी धोरणा’अंतर्गत साडेतीन हजार अर्ज मंजूर
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
chandrapur lloyds metals project
चंद्रपूर: घुग्घुसवासियांचा श्वास प्रदूषणामुळे गुदमरणार
mla sunil prabhu complaint to bmc commissioner over defective water pump
पाणी उपसा करणारे पंप बंद, आपत्कालीन विभागात दूरध्वनीलाही प्रतिसाद नाही, आमदार सुनील प्रभू यांची आयुक्तांकडे तक्रार
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
Onion export decision delayed for three days due to technical reasons
कांदा निर्यातीचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून अधांतरी
Tiger hunting, Tiger, Tiger hunter punished,
वाघाची शिकार : तब्बल ११ वर्षांनंतर शिकाऱ्याला शिक्षा…!

हेही वाचा – ठाण्यातील शाळा, महाविद्याल्यांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय

महत्त्वाचे म्हणजे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या उद्या ( मंगळवार) दिनांक ०९ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौदळे यांनी सांगितले आहे.

मुंबईत सध्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईकरांनी आश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. तसेच मुंबईकरांना आपातकालीन परिस्थितीत काही मदत लागल्यास १९१६ या क्रमांकावर फोन करावा, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – अतिवृष्टीमुळे उद्या पुण्यातील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

दरम्यान, सोमवारी रात्री मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्षास भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागात नियंत्रण कक्षाला भेट देत परिस्थिती जाणून घेतली.