इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गेल्या काही काळापासून विविध तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. राजकीय लढाईत अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा त्यात बळी जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. पालिकेच्या काही उपायुक्तांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

करोनाकाळात केलेल्या मुंबई महापालिकेने  घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचीही गेल्या काही महिन्यांपासून विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच आर्थिक गुन्हे शाखेनेही माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यात एक अतिरिक्त आयुक्त व एक उपायुक्त यांचा समावेश आहे. एका बाजूला विशेष तपास पथकामार्फतही काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

कधी कोणालाही चौकशीला सामोरे जावे लागू शकते, असे भीतीचे वातावरण आहे. करोनाकाळात मुंबई महापालिकेने केलेल्या कामांचे कौतुक करण्यात आले होते. करोना संसर्गापासून लोकांना वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात जीव धोक्यात घालून काम केले होते. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यावश्यक निर्णय घेतले. औषध खरेदी करणे, करोना केंद्र उभारणे, त्यामध्ये रुग्णांसाठी आरोग्य सेवा देणे, प्राणवायूचा तुटवडा होऊ नये म्हणून प्रयत्न करणे हे सगळे निर्णय साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये घेतले असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येते.

बुधवारी पालिकेच्या काही उपायुक्तांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर म्हणणे मांडले. काही उपायुक्तांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे समजते. दरम्यान, याबाबत कोणीही उपायुक्त बोलण्यास तयार नसले तरी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

संघटनेचा आंदोलनाचा इशारा

पालिका वर्तुळात सुरू असलेल्या या चौकशीच्या ससेमिऱ्याच्या काळात पालिका प्रशासनाला पाठिंबा देण्याचा निर्णय म्युनिसिपल मजदूर युनियनने घेतला आहे. याप्रकरणी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.