अंमलबजावणीला मुहूर्त मात्र सापडेना; मुंबईच्या अनेक भागात नियोजनाअभावी दुर्भिक्ष
तहान भागविण्यासाठी मुंबईकरांना ‘समान पाणीवाटप’ करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. परंतु, आजही मुंबईत अनेक भागांत अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी त्रस्त असून डोंगराळ भागांत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही ‘समान पाणीवाटपा’च्या अंमलबजावणीसाठी पालिका अधिकाऱ्यांना मुहूर्तच सापडलेला नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसे पाणी असतानाही मुंबईतील अनेक भागांतील रहिवासी तहानलेलेच आहेत.
पाण्याचा उपलब्ध साठा लक्षात घेऊन पालिकेने मुंबईमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू केली आहे. मात्र कमी दाबामुळे अनेक भागातील रहिवाशांना अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत, यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईमध्ये समान पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने पालिका अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. तसेच डोंगराळ भागांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा, असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजावले होते.
आयुक्तांनी आदेश देऊनही अद्याप मुंबईकरांना ‘समान पाणीवाटप’ करण्याच्या दृष्टीने कोणत्याच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा