पालिका आयुक्त, महापौरांपासून प्रभाग समित्यांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांचे रात्री उशीरापर्यंत सारथ्य करणाऱ्या सारथ्यांच्या वेतनाचा भार महापालिकेला जड होऊ लागला आहे. त्यामुळे राजकारणी व अधिकाऱ्यांची वाहने त्यांच्या घरीच सोडून चालकांनी घरी जाण्याचा फतवा प्रशासनाने काढला आहे. त्याविरोधात त्यांनी शनिवारी आंदोलन केले.
पालिकेतील चालकांचे वेतन अतिरिक्त आयुक्तांच्या वेतनापेक्षाही अधिक होत असल्यामुळे चालकांनी संबंधित राजकारणी अथवा अधिकाऱ्याच्या घरीच गाडी सोडावी आणि दुसऱ्या दिवशी तेथून गाडी घ्यावी,
जास्त वेळ काम करतो म्हणून आम्हाला अधिक वेतन मिळते. असा या वाहन चालकांचा प्रश्न आहे. पालिकेची वाहने उभी करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी अनेक यानगृहे आहेत. यावर बिल्डरांचा डोळा आहे. ही बंद करुन भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या वेतनाचा मुद्दा पुढे करण्यात येत आहे, असे चालकांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा