मुंबई : प्रकाश प्रदूषण करणाऱ्या झाडांवरील रोषणाईबद्दल उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी आपापल्या हद्दीतील झाडांच्या खोडांवरील दिव्यांची माळ हटवण्यास सुरूवात केली. ही रोषणाई हटविण्याची मागणी करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> वांद्रे वरळी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाला जोडण्यासाठी समुद्रात पूल
जी-२० परिषदेच्या निमित्ताने परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तर काही ठिकणी सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत मुंबई व ठाण्यातील झाडांवरील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही सजावट प्रकाश प्रदूषणात भर घालणारी असून झाडांवर अधिवास करणारे पक्षी व कीटकांवर दिव्यांचा वाईट परिणाम होत असल्याने पर्यावरणप्रेमींनी याचिका दाखल केली होती. या याचिकेची गेल्या आठवडयात उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन सरकार व मुंबई महापालिकेला नोटीस बजावली होती. त्यानंतर अखेर महापालिकेला जाग आली असून विभाग कार्यालयांनी रोषणाई हटवण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी परिसरात रोषणाई हटवण्याचे काम सुरू झाले.
रोषणाई धोकादायक का?
* वृक्षांच्या वाढीवर परिणाम, अवेळी पानगळीची भीती
* कीटक विचलित होण्याची शक्यता * झाडांवरील पक्ष्यांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम