गणेशोत्सव मंडळासाठी ‘दोनच बॅनर्स’ची अट घालण्याच्या निर्णयावरून घुमजाव करण्याच्या तयारीत असलेल्या  पालिकेला नागरीकांच्या सतर्कतेसाठी लावण्यात येणारे बॅनर्स मात्र मंजूर नाहीत. काही सामाजिक संस्थांनी पालिकेची परवानगी न घेता सोनसाखळी चोरांची छायाचित्रे असलेले बॅनर्स लावलेले आहेत. हे बॅनर्स त्वरीत काढून टाकण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सोमवारी दिले. तसेच यापुढे पोलिसांकडून बॅनरच्या परवानगीसाठी अर्ज येईपर्यंत कोणालाही असे बॅनर लावण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असेही त्यांनी बजाविले आहे.

Story img Loader