लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: महालक्ष्मी धोबी घाट येथील मुंबई महानगरपालिकेच्या एक एकर भूखंडावर पाळीव प्राणी आणि भटक्या प्राण्यांवरील वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेसाठी उभारण्यात येत असलेले सुसज्ज चार मजली रुग्णालय वर्षअखेरपर्यंत सुरू होणार आहे. तर महानगरपालिकेची मृत प्राण्यांसाठी पहिली दहनभट्टी या महिन्यात सुरू होणार आहे.

Water reservation process stalled in many districts due to lack of Guardian Minister is now being cleared through initiative of Water Resources Minister
कालवा सल्लागार समिती बैठकांची सूत्रे जलसंपदा मंत्र्यांकडे, पालकमंत्र्यांअभावी पुढाकार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
RTE admission process begins today 6053 seats available in 327 schools Mumbai print news
आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू ; ३२७ शाळांमध्ये ६ हजार ५३ जागा उपलब्ध
seahorses sindhudurg loksatta news
समुद्री घोड्यांच्या संवर्धन, प्रजनन प्रकल्पासाठी सिंधुदुर्गची निवड
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार

पाळीव प्राणी आणि रस्त्यांवरील भटक्या प्राण्यांचा मृत्यू झाला की त्यांच्या मृतदेहाची कशी विल्हेवाट लावायची याचा मोठा प्रश्न असतो. प्राण्यांच्या मृतदेहाचे दहन करण्यासाठी महानगरपालिकेने तीन ठिकाणी दहनभट्ट्या सुरू करण्याचे ठरवले होते. शहर भागात महालक्ष्मी, पश्चिम उपनगरात मालाड, तर पूर्व उपनगरात देवनार येथे या दहनभट्या सुरू करण्यात येणार आहेत. याकरीता पालिका साडेसतरा कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी मालाड येथील प्राणी दहनभट्टी ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू होत असून, पाळीव श्वान, भटके मृत श्वान, मांजरी, पक्षी यांच्यासाठी दहनभट्टीची सुविधा मोफत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कचराभूमीवर जाणाऱ्या प्राण्यांच्या मृतदेहांवर यापुढे योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा… पुण्यातील म्हाडाच्या पाच हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत; ‘या’ तारखेपासून अर्ज विक्री-स्वीकृती

महालक्ष्मी येथे आर्थररोड कारागृहाच्या मागील भूखंडावर ३०० प्राणी क्षमता असलेले महानगरपालिकेचे प्राण्यांचे पहिले रुग्णालय बांधण्यात येत असून त्याचे कामही पूर्ण होत आले आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट व मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ”बांधा, वापरा” या धर्तीवर हे रुग्णालय बांधण्यात येत असून त्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. सर दोराबाजी टाटा ट्रस्ट यांना हे रुग्णालय बांधण्यासाठी २०१८ मध्ये कंत्राट देण्यात आले होते.

हेही वाचा… वरळीमध्ये कोयत्याने हल्ला करून एकाची हत्या

मुंबईत प्राण्यांवर उपचार करण्यासाठी परळ येथे एकमेव रुग्णालय आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत भटक्या आणि पाळीव जनावरांची, कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्राण्यांमधील आजारांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचबरोबर प्राण्यांपासून माणसांना होणार्या आजारांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र मुंबईत महानगरपालिकेचा खार येथे फक्त एकच दवाखाना आहे. तसेच ठिकठिकामी सुमारे २०० खाजगी दवाखाने आहेत. उच्चभ्रू कुटुंबाना आपल्या पाळीव कुत्र्यांना, प्राण्यांना खाजगी दवाखान्याचे दर परवडतात.

हेही वाचा… ढाब्यावर थाळीत मृत उंदीर; वांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

मात्र गरीब कुटुंबाना आपल्या पाळीव प्राण्यांवर उपचार करणे परवडत नाही. तसेच मोकाट, भटक्या जनावरांना आपले आजार अंगावरच काढावे लागतात. त्यामुळे महानगरपालिकेने स्वत:चे पशुरुग्णालय सुरू करण्याचे ठरवले होते. त्यानुसार २०१८ मध्ये महानगरपालिकेने जागेचा शोध घेऊन रुग्णालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. आर्थर रोड कारागृहाच्या मागील ३०४५.४० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर सध्या महानगरपालिकेचे श्वान नियंत्रण कार्यालय असून त्या जागेवर हे रुग्णालय उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आला होता. या जागेवर रुग्णालय बांधून ते चालवण्यासाठी टाटा ट्रस्टची निवड करण्यात आली होती.

सध्या या रुग्णालयाचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. या रुग्णालयात आंतररुग्ण विभाग, शल्यशिकित्सा कक्ष, गायनॉकॉलॉजी कक्ष, अपघात व आपत्कालीन कक्ष, आयसीयू, कर्करुग्ण विभाग, त्वचा आजार कक्ष, शवदाहिनी, बाह्यरुग्ण विभाग, सिटीस्कॅन सेंटर, एमआरआय, रेडीओलॉजी, सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी आदी २५ विभागांचा समावेश असणार आहे. या रुग्णालयात भटक्या जनावरांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हे रुग्णालय चालवण्यासाठी टाटा ट्रस्टबरोबर ३० वर्षांचा करार करण्यात आला आहे. या रुग्णालयात दारिद्र रेषे खालील कुटुंबांच्या पाळीव प्राण्यांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहेत, असे मूळ प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे. तसेच या रुग्णालयात जखमी, आजारी व भटक्या जनावरांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत.

Story img Loader