मुंबईः मुंबईतील अगदी नेहमीसारख्याच एका सकाळी रेखा मेहता(४७) मानखुर्द या उपनगरातील मुख्य रस्त्यावरील पदपथावर नियमित लसीकरण अर्थात रुटीन इम्युनायझेशनबाबतचे (आरआय) बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन उभ्या होत्या. त्या प्रत्येक येणाऱ्याकडे आणि खासकरुन ज्यांच्याजवळ एखादे लहान मुल आहे, अशांकडे लसीकरण झाले आहे की नाही, याबाबत विचारणा करत होत्या. त्या लसीकरणाविषयी माहिती देऊन पोषक आहाराचे महत्वही समजावून सांगत होत्या. रेखा या व्यवसायाने शिक्षिका आहेत आणि सिटीझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईटस् (सीएसीआर) या लसीकरण विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबर काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आहेत.

लसीकरण हे मुलांचे संसंर्ग आणि जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करते आणि आणि त्यामुळेच लस ही मुलांच्या दृष्टीने जगातील सर्वात सुरक्षित पद्धत मानली जाते. मात्र कोविड-१९ महामारी दरम्यान लसीकरण विस्कळीत झाले आणि त्यामुळेच सरकारने आता त्यावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. झोपडपट्टी परिसर, दुर्गम खेडीपाडी येथील मुलांपर्यंत पोहचणे, लसीकरणाबाबतच्या शंकाकुशंका दूर करणे, हे सरकारसारसाठी नेहमीच आव्हानात्मक काम राहिले आहे.

Diwali Viral Video
‘करोडे रूपये दिले तरी ते दिवस परत येणार नाही’ चिमुकल्यांचा किल्ला बनवतानाचा VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवलं बालपण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
Why antimicrobial resistance is a major challenge facing the healthcare sector
प्रतिसूक्ष्मजीव रोधकता हे आरोग्यक्षेत्रासमोरील मोठे आव्हान का आहे?
lokjagar nepotism in the political families kin of influential leaders get ticket for assembly polls
लोकजागर : घराणेशाहीच्या टीकेला ‘घरघर’
Phadke Road
दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद
Congestion at Chitnis Park Chowk raises safety concerns for New English Medium School students
गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…


लसीकरण योग्यरित्या पार पाडण्यासाठी, सामाजिक संस्था महानगरपालिकेच्या पाठिंब्याने पालक आणि वडीलधाऱ्यांना कसे एकत्र आणतात, याचे उदाहरण म्हणजे मुंबईतील मानखुर्द, गोवंडी आणि कुर्ला येथील अतिशय गजबजलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये पहायला मिळेल. स्थानिक नागरिक, वैद्यकीय व्यवसायिक आणि स्वयंसेवकांचे हे जाळे शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यात, योग्य संदेश देण्यात आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या लसीकरणासाठी प्रोत्साहीत करण्यात मदत करते. रोजंदारीवर जाणारे पालक, स्थलांतर, आरोग्याबाबत फारशी जागरुकता नसणे, लसीकरणाविषयी साशंकता, यांसारखी आव्हाने असूनही, पालकांना लसीकरण केंद्रांपर्यंत आणण्यासाठी संवाद हीच या जाळ्याची गुरुकिल्ली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, याच भागांत गोवरच्या साथीचा उद्रेक झाला होता, जी आता संपूर्णपणे नियंत्रणात आली आहे.

“स्थानिक समुदायातील स्वयंसेवक, लोकांवर प्रभाव असलेले नेते, सामाजिक कार्यकर्ते, यांच्यासोबत काम करण्याचे धोरण हे लसीबाबतची साशंकता आणि नकार या प्रश्नांना भिडताना करताना अतिशय उपयुक्त ठरले आहे. बऱ्याच भागांमध्ये, खासकरुन स्थलांतरित लोकसंख्या असलेल्या भागांत, नियमित लसीकरणामध्ये अडचणी असून सर्व मुलांचे लसीकरण झाल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच आयसीडीएससह सहकार्याचा दृष्टीकोन ही काळाची गरज आहे. समाजातील विविध प्रकारच्या प्रभावशाली व्यक्तींकडून, जसे की मौलवी, मदरसे, औषधे विक्रेते, खासगी डॉक्टर्स आणि अगदी काही राजकीय प्रतिनिधीही, घेतलेली मदत ही लसीकरणाचे महत्त्व सांगण्यात आणि जागरुकता निर्माण करण्याच्या कामात उपयुक्त ठरली आहे आणि अगदी साशंकता आणि नकार परिवर्तित करण्यातही,” सीएसीआरचे संस्थापक, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन वाधवानी यांनी सांगितले. मुंबई, ठाणे आणि भिंवडीतील विविध भागांमध्ये लसीकरणचा संदेश पोहचवण्यासाठी सीएसीआरने स्वयंसेवक, कार्यकर्ते, नागरिक आणि स्थानिक प्रभावशाली लोकांचे एक भक्कम जाळे बांधले आहे.

मानखुर्द या उपनगरातील देवनार डंपिंग ग्राऊंडच्या अगदी समोर वर्षांनुवर्षे एक अतिशय दाट लोकवस्तीची झोपडपट्टी आहे. येथील बहुतेक लोक रोजंदारीवर काम करणारे आहेत आणि कमी उत्पन्न गटातील आहेत. झोपडपट्टीतील अरुंद गल्ल्यांमध्ये काही दोन-तीन मजली इमारती आहेत. त्यापैकी एक पांढर्‍या-हिरव्या रंगात रंगवलेली इमारत दारुल-उलुम गरिब नवाझ मदरसा असून तिथे मुसलमान मुलामुलींना धार्मिक शिक्षण दिलं जातं.

सीएसीआरमध्ये प्रकल्प व्यवस्थपाक असलेल्या सुवर्णा घाटगे (५१) या मदरशाचे अध्यक्ष मिसबहुर रेहमान (६७), यांना भेटण्यासाठी थांबल्या होत्या. त्यांनी त्यांना नियमित लसीकरणाची घोषणा उर्दूमध्ये करण्यासाठी एक कागद दिला. लसीकरणाच्या हेतूविषयी खात्री पटल्यामुळे, रेहमान यांनी एका उद्घोषकाला बोलावले आणि पंधरा मिनिटांच्या आत हा संदेश लाऊडस्पिकरवरुन संपूर्ण वस्तीमध्ये वाचून दाखवला गेला. “आम्ही नेहमीच चांगल्या कामाच्या पाठीशी असतो. अगदी समाजातल्या लोकांशीही मी लसीकरणाविषयीच्या गैरसमजांबद्दल बोलतो. आपण आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. आता ही घोषणा कमीतकमी ५००-७०० घरांपर्यंत नक्कीच पोहचली असेल. ज्यांच्याकडून लसीकरण राहिले असल्यास, असे पालकही पुढे येतील,” रेहमान यांनी अशी आशा व्यक्त केली. ते नेहमी लसीकरण मुलांच्या आरोग्यासाठी का उपयुक्त आहे याविषयीची माहिती जवळ ठेवतात. समाजात त्यांना सन्मान असल्याने लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि लोक त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतात.

वीस वर्षांहून अधिक काळ सुवर्णा घाटगे सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहेत आणि मानखुर्द परिसरातील कामगार वर्गांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांच्या मते, लोकांचा विश्वास जिंकणे ही त्यांच्यापर्यंत संदेश पोहचवण्याची गुरुकिल्ली आहे. विशेष म्हणजे, त्या अरबी भाषेतील काही शब्द शिकल्या आहेत आणि त्या कुराणमधील काही ओळी म्हणू शकतात, त्यामुळे त्यांना मुस्लिम समाजाशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाण्यात आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यात मदत होते. “मी वेगवेगळ्या समस्यांवर काम केले आहे असून सध्या लसीकरण हे केंद्रस्थानी आहे. कोविड-१९ मुळे आलेला व्यत्यय आणि महामारीमुळे झालेल्या स्थलांतरामुळे बरीच मुले लसीकरणाला मुकली. आता मात्र त्यांचे लसीकरण झाल्याचे आपण निश्चित केले पाहिजे आणि एकही मूल लसीकरणापासून वंचित रहायला नको,” त्या म्हणाल्या.

या प्रयत्नांना वैद्यकीय सहाय्य पुरवण्यात पालिका अधिकारी महत्वाची भूमिका पार पाडतात. पालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश गाढवे यांनी आपण गोवरची साथ कशी आटोक्यात आणली हे सांगितले. “मानखुर्दच्या शिवाजी नगर परिसराची लोकसंख्या ८२,००० हजार आहे आणि ३२-३५ टक्के लोकसंख्या ही स्थलांतरित कामगारांची आहे. तिथे नकार आणि इतर काही आव्हाने होती. पण आम्ही लसीकरण शिबिरांची संख्या १६ वरुन ३२ पर्यंत वाढवली. त्याचबरोबर पालकांना रविवारी सुट्टी असेल आणि ते आपल्या मुलाला लसीकरणासाठी आणू शकतील, याचा विचार करुन, आम्ही रविवारीही शिबिरांचे आयोजन केले. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे एप्रिल महिन्यात गोवरच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही आणि आमचे लसीकरण जवळजवळ १०० टक्क्यांच्या आसपास आहे,” डॉ. गाढवे म्हणाले. ज्या भागांत लसीकरणाला नकार मिळत असेल किंवा लसीकरणाची टक्केवारी कमी असेल, अशा भागांना ते स्वतः वैयक्तिकरित्या भेट देतात आणि पालकांना त्यांच्या मुलांना आरोग्य केंद्रांवर आणण्याचे महत्व पटवून देतात.

मुंबईतील सर्वात मोठ्या डंपिंग ग्राऊंडच्या अगदी पुढेच, बुरख्यातील दोन तरुणी, यास्मिन फोडकर (३८) आणि नेहा पठाण (२२) या रस्त्याने जाणायेणाऱ्या महिलांना बोलावून लसीकरणाची आठवण करुन देत होत्या. “आम्ही प्रत्येक बाईकडे आणि लहान मूल बरोबर असलेल्या प्रत्येकाकडे जातो. आम्ही त्यांना लसीकरणाचे महत्व आणि त्यामुळे आजारापासून त्यांचे कसे संरक्षण होईल, याविषयीचे फोटो आणि माहितीपत्रके दाखवतो. त्याचबरोबर लसीकरणाबाबतची भीती दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या बाळांचे लसीकरण झाल्याची खात्री करण्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्याशी सतत संपर्क ठेवतो, त्यांना फोन करतो, त्यांच्या घरी जातो,” यास्मिननी म्हणाली.

सीएसीआरच्या ज्योती साठे आणि सागर खेताडे हे कार्यकर्त्यांच्या या जाळ्याचा कणा आहेत. सकाळपासूनच त्यांना नेमून दिलेल्या भागांना ते दोघे भेटी देत रहातात, पालकांना भेटतात, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये बैठकांचे आयोजन करतात, कुटुंबांना फोनवरुन लसीकरणाची आठवण करुन देतात आणि काम सुरुळीतपणे पार पडेल, हे सुनिश्चित करतात.

लसीकरणाबद्दलचा संदेश सर्वत्र पसरवण्यासाठी सीएसीआरने वेगवेगळ्या पद्धतीही अवलंबल्या आहेत. औषधासाठी दुकानात येणाऱ्या पालकांशी लसीकरणाबाबत संवाद साधण्यासाठी म्हणून त्यांनी त्या भागातील औषध विक्रेत्यांनाही सहभागी करुन घेतले आहे. गोवंडी भागातील अली मेडीकलचे पवन गुप्ता यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. “गोवरच्या साथी दरम्यान मी काही पालकांना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात जायला सांगितले. एखादी व्यक्ती लहान मुलाला सोबत घेऊन औषध घेण्यासाठी आली तर मी त्यांच्याशी लसीकरणाबाबत बोलतो आणि त्यांना आरोग्य केंद्रांवर पाठवतो. वैद्यकीय व्यवसायातील असल्यामुळे, सहसा लोक माझ्यावर विश्वास ठेवतात,” गुप्ता यांनी सांगितले.

आंगणवाडी ही आणखी एक अशी संस्था आहे जिचा वापर सीएसीआरद्वारे पालकांपर्यंत पोहचण्यासाठी केला जातो. “येथे, आम्ही पालकांशी बोलतो आणि त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगतो. आम्ही त्यांना कधी आणि कोणती लस द्यायची याचे वेळापत्रक देतो. हे प्रयत्न जागरुकता निर्माण करण्याच्या कामी मदत करतात,” कुर्ला परिसरात बैठक आयोजित करताना ज्योती साठे हिने सांगितले.