खड्डय़ाचे छायाचित्र काढून ते संगणक प्रणालीवर टाकण्याचे ज्ञान पालिकेच्या अभियंत्यांना नसल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतरही खड्डय़ांची शोध मोहीम सुरूच झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांचे मोबाइलवर छायाचित्र काढून ते बुजविण्यासाठी कंत्राटदारांपर्यंत संगणकीय प्रणालीद्वारे पोहोचविण्याचा प्रकल्प पालिकेने सुरु केला.
या प्रॉबिटी सॉफ्टवेअर संगणकीय प्रणालीमध्ये मुंबईकरांनाही सामावून घेण्यात आले होते. त्यामुळे आपल्या अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलवर खड्डय़ाचे छायाचित्र काढून ते पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याची सुविधा मुंबईकरांना उपलब्ध झाली होती. मात्र यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतरही या प्रणालीवर अत्यंत कमी संख्येने खड्डय़ांची छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात होणारी रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेऊन प्रशासनाने ६० अभियंत्यांची अतिरिक्त कुमक रस्ते विभागाला दिली आहे. या ६० अभियंत्यांना मोबाइलवर छायाचित्र काढून ते संकेतस्थळावर पाठविण्याचे ज्ञान नसल्यामुळे खड्डे बुजविण्याची मोहीम थंडावली आहे. या अभियंत्यांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खड्डय़ांचे छायाचित्र पाठविणे शक्य
ब्लॅकबेरी, आयफोन आणि सिम्बियन मोबाइलवरुन काढलेली खड्डय़ांची छायाचित्रे पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची सुविधा प्रोबिटी सॉफ्टवेअर कंपनीने उपलब्ध केली आहे. http://www.voiceofcitiyzen.com या संकेतस्थळावर ‘अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलसाठी’ आणि ‘अन्य मोबाइलसाठी’ अशी दोन अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. छायाचित्र पाठविण्यासाठी ब्लॅकबेरी, आयफोन किंवा सिम्बियन मोबाइल धारकांना ‘अन्य मोबाइलसाठी’ हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून मग छायाचित्र पाठविणे शक्य होईल.