मुंबई: हवेचा स्तर पुन्हा एकदा बिघडू लागला असून हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता २५ स्मॉग गन फॉगिंग यंत्र भाड्याने घेण्याचे ठरवले आहे. स्मॉग गन यंत्र विकत घेण्याऐवजी तूर्तास ते भाड्याने घेण्यात येणार आहेत. या यंत्रामधून पाण्याचे तुषार वातावरणात शिंपडले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत पुन्हा एकदा हवेचे प्रदूषण वाढू लागले असून पालिकेने पुन्हा एकदा उपाययोजनांवर लक्ष्य देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता धूळ रोखण्यासाठी स्मॉग गन यंत्राचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. ऑक्टोबर महिन्यात हवेचा स्तर बिघडला तेव्हा पालिका प्रशासनाने मुंबईसाठी ३० यंत्रे विकत घेण्याचे ठरवले होते. मात्र ही यंत्रे विकत घेण्यापेक्षा आता २५ यंत्रे भाड्याने घेण्यात येणार आहेत. या यंत्राद्वारे पाण्याचा फवारा मारता येतो. त्यामुळे धुळीचे कण जमिनीवर बसतात.

बांधकामांस्थळी उडणाऱ्या धुळीमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी ठाण्याच्या धर्तीवर स्मॉग गन फॉगिंग यंत्रे घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा… दहिसर वर्सोवा मार्गासाठी सहा कंत्राटदार निश्चित; सहापैकी दोन टप्प्यांची कामे रस्त्याच्या कंत्राटदाराला

वाहनारूढ यंत्रे उपलब्ध होण्यास दोन – अडीच महिने लागतील. तसेच ही यंत्रे ज्या वाहनावर आरूढ असतात ती बऱ्याचदा डिझेलवर चालणारी असतात. त्यामुळे अशी वाहने खरेदी करण्यापेक्षा सध्या भाड्याने घेऊन मग कालांतराने विजेवर चालणाऱ्या गाडीवरील यंत्रे तयार करवून घेण्याचा विचार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

करोना काळात पालिकेने अशा प्रकारच्या यंत्रांचा वापर केला होता. अशी आठ यंत्रे सध्या असून आणखी काही यंत्रे येत्या आठवड्यात पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.