विक्रमवीर अभिनेता व निर्माता प्रशांत दामले यांचा मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचे विक्रमी १०७०० प्रयोग केल्याबद्दल आणि रंगभूमीवरील योगदानाबद्दल श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेच्या वतीने प्रशांत दामले यांचा मंगळवार, १९ मार्च रोजी सत्कार केला जाणार आहे. श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेचे हीरकमहोत्सवी वर्ष सुरू असून त्यानिमित्त १९ मार्चपासून आठ दिवसांचा नाटय़ महोत्सव आयोजित करण्यात आला असून पहिल्या दिवशी प्रशांत दामले यांच्या सत्कारानंतर त्यांच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा सायंकाळी ७ वाजता प्रयोग श्री षण्मुखानंद चंद्रशेखरन्द्र सरस्वती सभागृहात होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2013 रोजी प्रकाशित
प्रशांत दामले यांचा मंगळवारी सत्कार
विक्रमवीर अभिनेता व निर्माता प्रशांत दामले यांचा मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचे विक्रमी १०७०० प्रयोग केल्याबद्दल आणि रंगभूमीवरील योगदानाबद्दल श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेच्या वतीने प्रशांत दामले यांचा मंगळवार, १९ मार्च रोजी सत्कार केला जाणार आहे.
First published on: 17-03-2013 at 01:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc honored prashant damle on tuesday