मुंबई : मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून मुंबईत एकूण १८८ इमारती अतिधोकादायक स्थितीत उभ्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ११४ इमारती पश्चिम उपनगरातील आहेत. तर शहर भागात २७ आणि पूर्व उपनगरातील ४७ इमारतींचा त्यात समावेश आहे. सर्वाधिक अतिधोकादायक इमारती मालाड परिसरात आहेत. पालिकेने या धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली असून इमारतीतील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या ‘सी १’ श्रेणीतील इमारतींची यादी मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या खासगी निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्याचे आढळून आले आहे. गेल्यावर्षी मुंबईत २२६ धोकादायक इमारती होत्या. यंदा त्यांची संख्या कमी झाली आहे. काही धोकादायक इमारती पाडून टाकण्यात आल्या आहेत. मात्र तरीही मुंबईत १८८ इमारती उभ्या असून त्यात रहिवासी राहत आहेत.

Maharashtra Pollution Control Board and MIDC face to face
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अन् एमआयडीसी आमनेसामने! सलग दुसऱ्या महिन्यात नोटीस बजावून कारवाईचा इशारा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Jayashree Thorat, case registered against Jayashree Thorat,
अहमदनगर : आंदोलन करणाऱ्या जयश्री थोरात आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल
raid on gambling den is just a call away from the police station
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, ६० जण ताब्यात; एक लाखांची रोकड जप्त
airlines hoax call
बॉम्बच्या खोट्या धमक्यांनी विमान कंपन्यांना किती आर्थिक नुकसान होतं?
Complaint to Mumbai Police regarding two web series on Alt Balaji
‘अल्ट बालाजी’वरील दोन वेबसिरीजप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार
baba siddique son Zeeshan on target
‘बाबा सिद्दिकी नाहीतर झिशान’, शूटर्सला काय सांगण्यात आलं होतं? पोलिसांनी उलगडला धक्कादायक प्लॅन
BJP minister accused in multi state credit union scam Petition of the Deputy Commissioner of Police
बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्यात भाजप मंत्र्यावर आरोप; पोलीस उपायुक्ताच्या याचिकेनंतर खळबळ पोलीस महासंचालकांकडेही बोट

हेही वाचा >>> सलमान खान गोळीबार प्रकरण : आरोपींना मदत करणाऱ्याला राजस्थानमधून अटक

‘सी-१’ श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी महानगरपालिकेच्या वतीने www.mcgm.gov.in संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या इमारती वास्तव्यास धोकादायक असल्यामुळे रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.

मुंबईतील १८८ इमारतींना बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ३५४ अन्वये ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित करण्यात आले आहे. यापैकी काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. अशा इमारतींत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी तत्काळ ताबा सोडून सदर इमारत स्वतःहून निष्कासित करावी. उपकर प्राप्त इमारती व इतर धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारती बाबत संबंधित सक्षम प्राधिकरणाने गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर राहील आणि त्यासाठी महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> रेल्वे मार्गालगत वृक्ष छाटणीस वेग, वृक्ष छाटणीचे ५० टक्के काम पूर्ण

धोकादायक इमारत कशी ओळखावी

इमारतीच्या आर. सी. सी. फ्रेम कॉलम, बीम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल होत असल्याचे आढळल्यास उदा. इमारतीचे कॉलम, बीम, स्लॅब झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीच्या तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे, इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढणे, इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडणे, इमारतीच्या कॉलमचा भाग फुगणे, इमारतीच्या आर. सी. सी. चेंबर्स (कॉलम, बीम्स) व विटांची भिंत यातील सांधा / भेगा वाढणे अशी लक्षणे दिसल्यास इमारत धोकादायक असल्याचे समजले जाते.

इमारत धोकादायक बनल्यास रहिवाशांनी काय करावे

१) मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६/ २२६९-४७२५/२२६९-४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

२) इमारत तातडीने रिकामी करावी.

३) आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना सतर्क करावे.

खासगी इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून घेणे अनिवार्य बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ३५३ बी तरतुदीनुसार, प्रत्येक खासगी इमारतीचे मालक व भोगवटादार यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या आणि ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरिता वापरात असलेल्या इमारतींची महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांद्वारे परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे. संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांकडे संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.