‘पॉटहोल ट्रेकिंग’च्या धर्तीवर मुंबईत ‘फेरीवाला ट्रेकिंग’ यंत्रणा राबवून अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्धची कारवाई अधिक प्रभावी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर फेरीवालाविरोधी कारवाई करणाऱ्या गाडीवर सेंसर बसवून कर्मचाऱ्यांवरही नजर ठेवण्यात येणार आहे.
पावसाळ्यात खड्डेमय होणाऱ्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करता यावी यासाठी पालिकेने ‘पॉटहोल ट्रेकिंग’ योजना राबविली होती. या योजनेनुसार मोबाइलवर काढलेले छायाचित्र पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर ते संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कंत्राटदारांना पाठविण्यात येत होते. त्यानंतर हे खड्डे ४८ तासांमध्ये बुजविणे बंधनकारक होते. त्याच धर्तीवर ‘फेरीवाला ट्रेकिंग’ यंत्रणा राबविण्यात येईल. पदपथ अडविणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मोबाइलवर फोटो काढून तो पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. त्यानंतर तो संबंधित अधिकाऱ्याला पाठविण्यात येईल. विभाग कार्यालयातील वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक आयुक्त यांनी अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई न केल्यास काढलेले छायाचित्र पालिका उपायुक्तांना पाठविण्यात येणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या पालिकेच्या चोर गाडय़ांवर सेंसर बसविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा