मुंबई : बांधकामाच्या ठिकाणी पंधरा दिवसांत पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा आणि महिन्याभरात धूळशोषक यंत्रे (अॅण्टी स्मॉग मशीन) कार्यान्वित न केल्यास अशी बांधकामे बंद करून विकासकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी दिला. मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कचरा जाळण्यास बंदी घालण्यासह अनेक उपाययोजनांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हवेचा स्तर खालावला आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व सरकारी, खासगी संस्था, संघटनांची संयुक्त बैठक घेऊन महापालिका आयुक्तांनी धूळ आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, असे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने बुधवारी उपाययोजना जाहीर केल्या.
हेही वाचा >>> “लाईक-सबस्क्राईब करा आणि पैसे कमवा”, मुंबईतील फॅशन डिझायनरला १० लाखांचा गंडा; काय आहे हा स्कॅम?
मुंबईतील हवेचा स्तर खालावण्यामागे धुळीचे मोठे प्रमाण हे महत्त्वाचे कारण आहे. ही धूळ बांधकामामुळे निर्माण होते. मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे पालिकेने बांधकामाच्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या उपाययोजनांवर भर दिला आहे. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी येत्या पंधरा दिवसांत पाण्याची फवारणी (स्प्रिंकलर) यंत्रणा असावी असे निर्देश देण्यात आले आहेत. धूळ प्रतिबंधक यंत्र (अॅण्टी स्मॉग मशीन) बसवण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांतर्गत (वॉर्ड) येणाऱ्या बांधकाम ठिकाणांची पाहणी करण्यासाठी तातडीने विशेष पथके स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात दोन ते सहा पथके तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील. पथकात दोन अभियंते, एक पोलीस, एक क्लीन-अप मार्शल असेल आणि त्यांचा प्रमुख एक पालिका अधिकारी असेल. या पथकाला एक वाहनही देण्यात येईल. पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन थेट चित्रीकरण करावे आणि उपाययोजनांमध्ये कमतरता आढळून आल्यास तिथेच नोटीस बजावून अशी बांधकामे रोखावीत किंवा बांधकामाचे क्षेत्र सील करण्याची कारवाई करावी, असे पालिकेने नियमावलीत म्हटले आहे.
हवाभान : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, बुधवारी मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत नोंदला गेला. बुधवारी सायंकाळी वरळी येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९१ होता. कुलाबा येथे १७६, माझगाव १३१, कुर्ला १५८, विलेपार्ले १५८, चकाला १८२, पवई १२३, मालाड १५१, बोरिवली येथे ९२ होता.
नवी मुंबईत दोन विकासकांवर कारवाई
नवी मुंबई : प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाशी परिसरातील दोन मोठय़ा पुनर्विकास प्रकल्पांना पालिकेने नोटीस बजावून दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. वाशी सेक्टर २ येथील मेसर्स मिस्त्री आणि वाशी सेक्टर ९ येथील अरिहंत अद्विका डेव्हलपर्स या दोन विकासकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी दिली. हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही पालिकेने या विकासकांना दिले.
डिझेलवरील अवजड वाहनांना बंदी
डिझेलवर चालणाऱ्या आणि आठ वर्षांपेक्षा जुन्या अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशासाठी बंदी घालावी, असेही या नियमावलीत म्हटले आहे. त्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपवण्यात आली आहे. बांधकाम साहित्य, राडारोडा ने-आण करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणार नाहीत आणि वाहनांच्या चाकांची प्रत्येक खेपेनंतर व्यवस्थित स्वच्छता केली जात आहे, याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची सूचनाही पालिकेने केली.