मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक भागांची व्यापक स्तरावर स्वच्छता व्हावी तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी याहेतूने महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेतर्फे पूर्वीपासूनच दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवली जाते. मात्र, ‘गार्बेज फ्री अवर’ या नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत सोम ते शुक्रवार दररोज सकाळी ११ ते १ या वेळेत मुंबईतील विविध भागांत व्यापक स्तरावर स्वच्छता केली जाणार आहे. स्वच्छता कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक पालिका विभागात नोडल ऑफिसरचीही नेमणूक करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या मोहिमेला सुरुवात होईल.

गेल्या वर्षभरापासून मुंबईत दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत हजारो टन कचरा, राडारोडा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम राबवण्यासह महानगरपालिकेने आता रोज शहरातील विविध भागांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत रेल्वे परिसर, सार्वजनिक शौचालये, धार्मिक स्थळे, वाहतूक बेटे, बाजार, वाहनतळे, पर्यटन स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता केली जाणार आहे. स्वच्छता मोहीम विनाअडथळा पार पाडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने हटविण्याबाबत संबंधित विभागाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, स्वच्छता मोहिमेत अडथळा ठरणाऱ्या रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतरित्या उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. अस्वच्छता पसरवणाऱ्यांना दंड करण्यासाठी क्लीन अप मार्शल्सही तैनात करण्यात येणार आहेत. स्वच्छता केलेल्या ठिकाणचे स्वच्छतेपूर्वी आणि नंतरचे छायाचित्र घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक पालिका विभागात नोडल ऑफिसरपदी सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला

स्वच्छतेच्या जागरूकतेची पथनाट्य आणि पोवाडे

मुंबईत दररोज सुमारे ६५०० टन इतका कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट लावताना पालिकेला विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. नागरिकांमध्ये कचरा विलगीकरण आणि संबंधित गोष्टींबाबत जागरूकता नसल्याने कचऱ्याची समस्या आणखी जटील झाली आहे. त्यामुळे कचरा आणि स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्नही केला जाणार आहे. पालिकेने पथनाट्य, पोवाडे व अन्य लोककलेच्या माध्यमातून जागरूकता करण्याचे ठरविले आहे. स्वच्छता आणि अन्य चांगल्या सवयी अंगीकारण्याबाबत नागरिकांना आवाहन केले जाईल.

Story img Loader