रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबई आणि उपनगरांत किमान 10 जणांचा नाहक जीव गेल्यानंतर आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर अखेर मुंबई महानगरपालिकेने खड्डे बुजवण्यासाठी व खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नवीन उपाय शोधला आहे. मुंबई महानगरपालिकेने mybmcpotholefixit नावाचं एक नवं मोबाईल Application लाँच केलं आहे.
रस्त्यांवर खड्डे दिसल्यास त्याची या अॅपद्वारे तक्रार करण्याचं आवाहन बीएमसीद्वारे करण्यात आलं आहे. तक्रार केल्यानंतर तेथील खड्डे बीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून बुजवले जातील. याशिवाय केलेल्या तक्रारीवर बीएमसीकडून काय कारवाई झाली याचे अपडेट नागरिकांना या App द्वारे मिळतील. अशी माहिती बीएमसीने दिली आहे. बीएमसीने ट्विटरद्वारे या Application बाबत माहिती दिल्यानंतर नेटकऱ्यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. पण, त्याचसोबत तुमच्या कर्मचाऱ्यांनी जे काम करायलं हवं ते आम्हाला करावं लागत आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला आहे. तसंच, किमान या App द्वारे तरी खड्ड्यांची समस्या सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या हे App केवळ अँड्रॉइड स्मार्टफोन धारकांसाठीच लाँच करण्यात आलं असून गुगल प्ले स्टोअरमध्ये ते उपलब्ध आहे. अद्याप आयओएस वापरकर्त्यांसाठी हे लाँच करण्यात आलेलं नाही. पण खड्ड्यांबाबत तक्रार करण्यासाठी त्यांना एक वेगळी लिंक देण्यात आली आहे. लवकरच आयओएस वापरकर्त्यांसाठीही हे अॅप लाँच केलं जाणार आहे.
Mumbai, we’ve found a ‘hole’-some solution to pothole woes! See a cavity? Report it with the new MyBMC Pothole Fixit app which identifies its location & keeps you updated on the resolution of your complaint. Together, let’s smoothen the road to progress: https://t.co/eH6CsOifYF pic.twitter.com/dGnwI9oSwI
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 19, 2019
iOS users can expect the app within a month. Meanwhile, they can use the following link to report potholes: https://t.co/7vWurhGfxc
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 19, 2019
बीएमसीने ट्विटरद्वारे या अॅप्लीकेशनबाबत माहिती दिल्यानंतर नेटकऱ्यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. पण, त्याचसोबत तुमच्या कर्मचाऱ्यांनी जे काम करायलं हवं ते आम्हाला करावं लागत आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला आहे. तसंच, किमान या अॅप्दवारे तरी खड्ड्यांची समस्या सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.