कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘मराठी भाषा पंधरवडय़ा’चे आयोजन करणाऱ्या महापालिकेत मराठी भाषा बाजूला सारून सर्रास इंग्रजीचा वापर करण्यात येत आहे. मराठीची पताका खांद्यावर मिरविणाऱ्या शिवसेना – मनसेचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
कार्यालयीन कारभार १०० टक्के मराठीमधून करण्याबाबत ठराव मंजूर झालेला असतानाही प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येत नाही. याचा प्रत्यय महापालिकेकडून विविध सादरीकरणादरम्यान पत्रकारांना आला. आतापर्यंत आरोग्य, मालमत्ता, शिक्षण विभाग आणि अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यापैकी केवळ मालमत्ता विभागाने १०० टक्के मराठीमध्ये सादरीकरण केले. परंतु अग्निशमन दल आणि आरोग्य व शिक्षण विभागाच्या सादरीकरणामध्ये मोठय़ा प्रमाणावर इंग्रजीचा वापर करण्यात आला. तसेच अन्य कामकाजाच्या वेळीही इंग्रजी भाषेचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. मात्र मराठीबाणा बाळगणारी सत्ताधारी शिवसेना आणि मनसे मूग गिळून गप्प बसली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा