बेकायदा बांधकामांवर कारवाईस अधिकाऱ्यांची टाळाटाळ
दस्तुरखुद्द महापौरांनी उद्घाटन केलेल्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असून केवळ महापौरांनी उद्घाटन केल्यामुळे अनियमितता असलेल्या या हॉटेलविरुद्ध कारवाई करण्यास पालिका अधिकारी कचरत असल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. हॉटेलमधील अनियमितता आणि हुक्का पार्लरबाबत महापौरांना कल्पना नसेल त्यामुळेच त्या तेथे गेल्या असाव्यात, अशी सारवासारव सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली.
इस्माईल खोपेकर मार्गावर डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकासमोर एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर ‘उस्तादी चारकोल लाऊंज’ नावाचे हॉटेल थाटण्यात आले आहे.
या हॉटेलचा उद्घाटन सोहळा ६ नोव्हेंबरला महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पार पडला.
या इमारतीमधील फारुक अलिमियाँ काझी यांच्यासह काही जणांनी यापूर्वी या हॉटेलबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यामुळे तीन वेळा या हॉटेलविरुद्ध नोटीस बजावून पालिकेने कारवाई केली होती.
या कारवाईत हॉटेलमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले होते. मात्र असे असतानाही पुन्हा हॉटेल उभारून त्याचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापौर असल्याने अनेक निमंत्रणे येतात. परंतु हे हुक्कापार्लर अनधिकृत असल्याची माहिती नसल्याने त्याच्या उदघाटनाला गेले होते. जर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्यास पालिका अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
-स्नेहल आंबेकर, महापौर