मुंबई महापालिकेच्या लिपिक पदासाठी घेण्यात येत असलेली ऑनलाइन परीक्षा ठाण्याचे घोडबंदर येथील केंद्र वगळता अन्यत्र शनिवारी सुरळीतपणे पार पडली. मात्र शनिवार, रविवारी घोडबंदर केंद्रावर होणारी परीक्षा रद्द केल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता.
लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेसाठी ३४ केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी चार केंद्रांवर तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि तेथे परीक्षा होऊ शकली नाही. ठाणे येथील एमबीसी केंद्रावर शनिवार आणि रविवारी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती उमेदवारांना मोबाइलवर एसएमएसमार्फत कळविण्यात आली. मात्र काही उमेदवारांना एसएमएस मिळाले नाहीत. हे उमेदवार शनिवारी केंद्रावर गेले असता परीक्षा रद्द झाल्याचे त्यांना समजले. ज्या केंद्रावर परीक्षा होऊ शकलेली नाही तेथे नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त किरण आचरेकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा