भांडवली मूल्याधारीत करप्रणालीचा अवलंब केल्यामुळे यावर्षी मालमत्ता करापोटी मुंबई महापालिकेला २०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.
गेल्या वर्षी मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ३७०० कोटी रुपये जमा झाले होते. परंतु नवीन कर प्रणाली अवलंबल्यामुळे यावर्षी फक्त ३५०० कोटी रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिली. या पध्दतीमळे ८१ टक्के घरगुती ग्राहकांचा मालमत्ता कर कमी होणार असल्याचेही ते म्हणाले. पालिकेने आत्तापर्यंत १,९४,७३४ मालमत्ताधारकांना बिले पाठवली आहेत. पण पाठविण्यात आलेल्या देयकांपैकी ३३६० देयकामध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा देयकांबाबत प्रभागांमध्ये सुनावणी घेतली जाणार आहे. बिले दुरुस्त करून १५ फेब्रुवारीपर्यंत देयके पाठविण्यात येणार आहेत. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरावा लागणार आहे.

Story img Loader