भांडवली मूल्यांवर आधारित सुधारित करांची आकरणी २७ डिसेंबरपासून म्हणजे हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अडीच वर्षांनी करण्यात येत असून, पालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार केवळ १७ टक्के लोकांनाच वाढीव दराने कर द्यावा लागणार आहे. जुन्या करआकारणीनुसार २०११-१२ मध्ये पालिकेला ३३९८ कोटी रु पये मालमत्ता कर मिळणार आहे. मात्र पाच वर्षांनतर बाजारभावानुसार करआकरणीला सुरुवात झाल्यानंतर पालिकेचे उत्पन्न ५५०० कोटी रुपये होईल, असा अंदाज पालिकेच्याच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला. ५०० चौरस फुटांपर्यंतच्य घरांसाठी पाच वर्षे जुन्याच दराने मालमत्ता कर आकरणी करण्यात येणार असली तरी त्यानंतर बाजारभावाच्या दराने करआकारणी करण्यात येणार आहे. करआकारणीचा अधिकार प्रशासनाकडे असावा असा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यामुळे पाच वर्षांनंतर नोकरदारवर्ग पोळून निघाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader