मुंबई उपनगरात विद्युतपुरवठा करणाऱ्या बीएसईएसला पालिकेने अत्यल्पदरात दिलेले भूखंड सरकारने रिलायन्स वीज कंपनीला बाजारभावात विकल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या व्यवहारात मोठा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
बीएसईएस कंपनीला वीज उपकेंद्र उभारण्यासाठी भूखंडांची आवश्यकता होती. त्यासाठी राज्य सरकारने महापालिकेकडून सवलतीच्या दरात भूखंड घेतले आणि ते बीएसईएस कंपनीला दिले. मात्र, बीएसईएस कंपनी रिलायन्स वीज कंपनीने घेतली आणि उपनगरांमधील विद्युतपुरवठय़ाची जबाबदारी नव्या कंपनीवर टाकण्यात आली. बीएसईएस कंपनीला अल्पदरात उपलब्ध केलेले पालिकेचे सुमारे १०० भूखंड राज्य सरकारने रिलायन्सला बाजारभावाने विकले. या व्यवहारातील किती पैसे पालिकेच्या तिजोरीत जमा झाले, सरकारने किती आणि कोणते भूखंड रिलायन्सला विकले याची माहिती द्यावी, असा मुद्दा उपस्थित करुन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी सुधार समितीच्या बुधवारच्या बैठकीत राज्य सरकारवर टीकास्र सोडले.
पालिका भूखंडांची रिलायन्सला विक्री
मुंबई उपनगरात विद्युतपुरवठा करणाऱ्या बीएसईएसला पालिकेने अत्यल्पदरात दिलेले भूखंड सरकारने रिलायन्स वीज कंपनीला बाजारभावात विकल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-05-2014 at 02:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc sale plots to reliance shiv sena allegation