गेल्या वर्षी मंडपासाठी खणलेले खड्डे न बुजविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पालिकेने ठोठावलेला २८ लाख रुपयांचा दंड माफ करावा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून केली आहे.गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त मंडप उभारण्यासाठी खड्डे खणण्यात आले होते. गणेशोत्सवानंतर खड्डे न बुजविणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ आणि लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली या दोन मंडळांना पालिकेने अनुक्रमे २३ लाख रुपये आणि पाच लाख रुपये दंड ठोठावला होता. ही दंडाची रक्कम मालमत्ता करातून वसूल करण्याची नोटीसही या दोन्ही मंडळांवर बजावण्यात आली होती. गेल्या वर्षी मॅरेथॉन आयोजकांनी केलेल्या नियमांच्या उल्लंघनाबाबत पालिकेने त्यांच्यावर एक कोटी ६० लाख रुपये दंड ठोठावला होता. मात्र आयोजकांनी राज्य सरकारकडे धाव घेतल्यानंतर दंड माफ करण्यात आला. त्याच प्रमाणे ही मागणी पुढे आली आहे.

Story img Loader