मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सवरील सुमारे १२० एकर जागेसह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील सुमारे १७५ एकर क्षेत्र असे मिळून जवळपास ३०० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर क्षेत्रफळाचा भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडला देण्यात येणार असून याबाबतच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे तब्बल १२० एकर जागा महानगरपालिका प्रशासनास प्राप्त झाली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स येथील २११ एकर क्षेत्रफळाचा भूखंड मागील १०० वर्षांहून अधिक काळ मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना मक्ता कराराने देण्यात आला होता. या जागेचा भाडेपट्टा करार काही वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर हा भूखंड व्यापक नागरी हिताच्या दृष्टीने पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत होते. यासाठी विविध कायदेशीर बाबी, वैधानिक आव्हाने आणि प्रशासकीय अडचणी यातून मार्ग काढून अखेर ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा तत्कालिन महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी, तसेच उपआयुक्त प्रशांत गायकवाड व मालमत्ता विभागाने या विषयाचा अत्यंत सखोल अभ्यास आणि पाठपुरावा करून सर्वमान्य तोडगा काढण्यात यश मिळविले. परिणामी, मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क आता प्रत्यक्षात साकारणे महानगरपालिका प्रशासनाला शक्य होणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर एकूण भूखंडापैकी १२० एकर भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास महाराष्ट्र शासनाने अलीकडे मान्यता दिली. तर, उर्वरित ९१ एकर भूखंड मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. हा भाडेपट्टा करार १ जून २०२३ ते ३१ मे २०५३ या ३० वर्षांच्या कालावधीसाठी आहे.

PM Modi Inaugurates Grand ISKCON Temple in Navi mumbai
देशाच्या केंद्रस्थानी अध्यात्म!‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
land acquisition for shaktipeeth expressway
आठवड्याभरात शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात; कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ८२०० हेक्टर जमिनीचे संपादन
Ramsar Conservation Court Public Interest Litigation filed by High Court
रामसर संवर्धन न्यायालयाकडे; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
Reserved roads in MHADA colonies belong to the municipal corporation Mumbai news
म्हाडा वसाहतींतील आरक्षित रस्ते पालिकेकडे; ‘जैसे थे’ स्थितीत हस्तांतरण
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत

हेही वाचा >>> राज्यात दोन महिन्यांत सापडले झिकाचे आठ रुग्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना

रेसकोर्सच्या भूखंडापैकी ९१ एकर क्षेत्र मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना सुपूर्द केल्यानंतर उर्वरित सुमारे १२० एकर जागा आता महानगरपालिकेच्या ताब्यात आली आहे. ही १२० एकर जागा तसेच रेसकोर्स परिसरामध्ये लागून असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील १७५ एकर जागा असे दोन्ही मिळून जवळपास ३०० एकर जागेवर न्यूयॉर्क, लंडन या शहरांच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आता वेग दिला जाईल. मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांच्याकडून परत घेण्यात आलेल्या जागेवर कोणत्याही स्वरुपाचे व्यावसायिक / व्यापारी बांधकाम करू नये. सदर जागेचा वापर सार्वजनिक वापराकरिता, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याकरीता करावा, असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे.

हेही वाचा >>> ‘महाविद्यालयात जीन्स, टी-शर्ट बंदी, हा तर तालिबानी फतवा’; शिंदे गटाच्या आमदाराने केली कारवाईची मागणी

या भाडेपट्टा करारावर एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत वर्षा निवासस्थानी मंगळवारी स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी डॉ. इक्बाल सिंह चहल, भूषण गगराणी, संजोग कबरे, प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त विनायक विसपुते, तसेच मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडच्या वतीने के. एन. धुंजीभॉय, डॉ. राम श्रॉफ, दिलीप ठक्कर, सचिव निरंजन सिंग आदी उपस्थित होते.

मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक ठळक होणार

महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२० एकर क्षेत्रफळाचा भूखंड महानगरपालिकेला पुन्हा प्राप्त होणे ही ऐतिहासिक अशी प्रशासकीय कामगिरी आहे. मुंबई किनारी रस्ता व महालक्ष्मी रेसकोर्स मिळून जवळपास ३०० एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित झाल्यास मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक ठळक होईल. मुंबईचे सध्या अस्तित्वात असणारे ३ हजार ९१७ एकर हरित क्षेत्र वाढून आता ४ हजार २१२ एकर इतके होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तब्बल ३०० एकरावरील हरित क्षेत्र हे मुंबईच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनात मोलाचे योगदान ठरेल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Story img Loader