पाणीपट्टी थकविणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून मंगळवारी विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत १,८८२ नळ जोडण्या महापालिकेने खंडीत केल्या आहेत. तसेच थकबाकी न भरणाऱ्या ८६ मालमत्तांचा १ रुपये दराने लिलाव करुन महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत.    
ठाणे महापालिका क्षेत्रात अनेकांनी पाणीपट्टी थकविल्यामूळे महापालिकेला अर्थिक नुकसान सोसावे लागत होते. यामुळे ही पाणीपट्टी थकविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नऊ प्रभागांमध्ये विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली होती.
या पथकांनी मंगळवारी विविध भागांमध्ये कारवाई करुन १८८२ नळ जोडण्या खंडीत केल्या आहेत. नौपाडय़ात ६९, उथळसर ५५, कोपरी २८७, वागळे ४०३, रायलादेवी ५७५, वर्तकनगर १५१, माजिवाडा मानपाडा ९४ आणि मुंब्रा-कौसा प्रभागात २४८ नळ जोडण्या महापालिकेने खंडीत केल्या आहेत.