मुसळधार पावसात कोसळलेल्या माहीममधील ‘अल्ताफ’ इमारतीमधील उर्वरित भाग शुक्रवारी पाडण्यात येणार असून या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या इमारतीबाबत रहिवाशांकडून करण्यात आलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
माहीममधील ‘अल्ताफ’ इमारत मुसळधार पावसाच्या तडाख्यात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. कोसललेल्या इमारतीचा निम्मा भाग शुक्रवारी पाडण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी या इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.ही इमारत धोकादायक बनल्याची तक्रार तीन वेळा पालिकेकडे करण्यात आली होती, असे अॅड. रिझवान र्मचट यांच्या समवेत या इमारतीमधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सांगितले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा