मुंबई : मुंबई महानगरपालिकेने विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या परिसरात, तसेच चेंबूरमधील जलतरण तलावाच्या परिसरात पुस्तक विक्री केंद्र सुरू केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या दोन्ही पुस्तक विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेची नाट्यगृहे आणि जलतरण तलावांच्या परिसरात पुस्तक विक्रीसाठी प्रकाशकांना सशुल्क जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रकाशकांना आवाहन करण्यात आले होत. प्रकाशकांकडून प्रतिसाद मिळल्यानंतर आता विविध ठिकाणी पुस्तक विक्री केंद्र सुरू करण्यात येत आहेत. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मॅजेस्टिक प्रकाशनचे पुस्तक विक्री केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर आता मंगळवारी स्वातंत्र्यदिनी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या परिसरात ज्योत्सना प्रकाशनला पुस्तक विक्री केंद्रासाठी जागा देण्यात आली असून पहिल्याच दिवशी या केंद्राला वाचक रसिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्याचबरोबर  चेंबूरमधील महानगरपालिकेच्या जनरल अरुणकुमार वैद्य तरण तलावाच्या परिसरात मनोविकास प्रकाशन या संस्थेला पुस्तक विक्री केंद्रासाठी जागा देण्यात आल्याची माहिती समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati temple
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि १ लाख २५ हजार दिव्यांची आरास, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट

हेही वाचा >>> टोलनाकाफोडीवरून अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “त्यांनी आधी…”

माहिती तंत्रज्ञान युगामध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुस्तक प्रदर्शनांकडे किंवा पुस्तकांच्या दुकानाकडे फारच मोजक्या नागरिकांचे पाय वळतात. त्यामुळे नागरिकांपर्यंत पुस्तके पोहोचावीत यासाठी महानगरपालिकेने प्रकाशकांना जागा व सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या मालकीची चार नाट्यगृहे असून या नाट्यगहांच्या परिसरात प्रकाशकांना पुस्तक विक्रीसाठी सशुल्क जागा उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच दादर, चेंबूर, कांदिवली, दहिसर पूर्व व अंधेरी पश्चिम येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावांच्या परिसरातही पुस्तक विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला महानगरपालिका आयुक्तांनीही प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यानुसार उपायुक्त किशोर गांधी यांनी या उपक्रमासाठी प्रकाशकांकडून अर्ज मागवले होते. मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या प्रकाशकांनी या योजनेला प्रतिसाद दिला आहे. या प्रकाशकांना अन्य प्रकाशकांची पुस्तकेही विक्रीसाठी या केद्रात ठेवता येणार आहे.

हेही वाचा >>> वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीचे विघ्न हरणार; एमएमआरडीए तयार करणार सर्वंकष वाहतूक आराखडा

या केंद्रांमध्ये शैक्षणिक पुस्तके विक्रीसाठी ठेवता येणार नाहीत. मराठी साहित्यातील पुस्तकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू येथे विकता येणार नाहीत, आक्षेपार्ह पुस्तेकांचीही विक्री करता येणार नाही, अशीही अट घालण्यात आली आहे.

वाचकांना १५ टक्के सवलतीत पुस्तके या उपक्रमासाठी प्रकाशकांना जागा, पाणी, वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रकाशकांना माफक अटी घालण्यात आल्या असल्याची माहिती वैशंपायन यांनी दिली. या जागेसाठी सहा हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच वाचकांना १५ टक्के सवलतीत पुस्तके देण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा वाचकांचाही फायदा होणार आहे.