मुंबई : येत्या रविवारी २४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. तसेच होळीच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे किंवा महानगरपालिकेच्या १९१६ या मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा…विल्सन जिमखान्याचा भूखंड जैन संघटनेकडे

‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे, हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये एक हजार ते पाच हजारांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

Story img Loader