मुंबई : कांदिवली पूर्वेकडील पोईसर नदीलगत वसलेल्या झोपडीधारकांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते. मुंबई महानगरपालिकेने येथील झोपडीधारकांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन लवकरच नदीलगत ३५० मीटरची संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला असून पालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे नदीलगतच्या झोपड्यांचे पुरापासून संरक्षण होणार आहे. संरक्षण भिंतीच्या बांधणीदरम्यान बाधित झोपडीधारकांचेही कांदिवलीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: ललित पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

पोईसर नदीलगतच्या हनुमान नगर, समर्थवाडी, सरस्वती चाळ, गंगा नगर, जनता नगर, भाजीवाडी आदी परिसरात वास्तव्याला असलेले झोपडीधारक गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूर परिस्थितीला सामोरे जात आहेत. पालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांपासून येथील बाधित झोपडीधारकांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींमध्ये स्थलांतर करून पोईसर नदीचे पात्र खोल करण्यात सुरुवात केली आहे. गतवर्षी सुमारे १६ अनधिकृत बांधकामांवरही पालिकेने कारवाई केली होती. आता नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संरक्षण भिंतीसाठी अडथळा ठरणाऱ्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच झोपडीधारकांना पर्यायी घरेही देण्यात येणार आहेत. पोयसर नदीची ३५० मीटर संरक्षण भिंत बांधण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या ३३ झोपड्यांवर पालिका आर. दक्षिण विभागाने नुकतीच कारवाई केली असून संरक्षण भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भिंत स्टॉर्म वाटर ड्रेन (पर्जन्य जलवाहिनी) विभागाकडून लवकरच बांधण्यास सुरुवात होणार आहे. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.